सत्तेचा माज करायचा नसतो - आमदार बाबर

नागेश गायकवाड
सोमवार, 2 जुलै 2018

सत्ता येते- जाते पण त्याचा कधी माज करायचा नसतो. मी निवडून आल्यावर जबाबदारीने कामे केली तर पराभवानंतर जनतेसोबत राहिलो. आज पराभवानंतर काहींचा चेहरा ही दिसत नाही तर गावात निवडून आलेल्या लोकांचे पाणी बंद करण्याची कामे करू लागले असल्याची टीका आमदार अनिल बाबर यांनी बनपुरी येथे ग्रामसचिवालय उद्घाटन प्रसंगी केली.

आटपाडी - सत्ता येते- जाते पण त्याचा कधी माज करायचा नसतो. मी निवडून आल्यावर जबाबदारीने कामे केली तर पराभवानंतर जनतेसोबत राहिलो. आज पराभवानंतर काहींचा चेहरा ही दिसत नाही तर गावात निवडून आलेल्या लोकांचे पाणी बंद करण्याची कामे करू लागले असल्याची टीका आमदार अनिल बाबर यांनी बनपुरी येथे ग्रामसचिवालय उद्घाटन प्रसंगी केली.

करगणी आणि बनपुरी येथे ग्रामपंचायत इमारत उद्घाटन आमदार श्री.बाबर यांच्या हस्ते केले. यावेळी तानाजीराव पाटील, भारत पाटील, गटविकास अधिकारी मीनाताई साळुंखे, विजयसिंह पाटील, सर्जेराव खिलारे, सरपंच विजयसिंह सरगर, बनपुरी सरपंच सुरवंता यमगर उपस्थित होते.

यावेळी आमदार बाबर म्हणाले, 'सत्तेचा उपयोग लोकांच्या कामासाठी करायचा असतो. लोकांचे पाणी बंद करण्यासाठी आणी विकास कामात खोडा घालण्यासाठी नाही. सत्ता आली म्हणून लोकांचे पाणी बंद करून  ग्रहण म्हणून मागे लागू नका. लोकांचा राहिला किमान राजधानीच्या राजाला काय वाटेल याचा तरी विचार करावा. राजकारणात समजू शकतो पण विकास कामात गमती-जमती करू नका. नाव ठेवणे आणि कामात खोडा घलण सोपा आहे.

प्रत्येक गावात रस्ते, ग्रामसचिवालय इमारती, शौचालय, गटारी, स्मशानभूमी सारख्या मूलभूत सुविधा उभा करून गावे विकासाची रोल मॉडेल करण्याचा प्रयत्न आहे. असेही त्यांनी सांगितले. तसेच, यावेळी झेडपीचे माजी सदस्य श्री. पाटील, दत्तात्रय यमगर, साहेबराव चवरे यांची भाषणे झाली. यावेळी नूतन सरपंच गणेश खंदारे, बाळासाहेब जगदाळे, सोमनाथ गायकवाड, साहेबराव पाटील,तुकाराम जानकर, भारत जावळे,अर्जुन सावकार,नंदू दबडे उपस्थित होते.

Web Title: MLA Babar statement on government