कऱ्हाड पालिकेच्या पाठीवर आ. बाळासाहेब पाटील यांची शाबासकीची थाप

karad
karad

कऱ्हाड : स्वच्छतेत देशात पहिला क्रमांक पटकावलेल्या येथील पालिकेच्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांसह सफाई कर्मचाऱ्यांच्या पाठीवर आमदार बाळसाहेब पाटील यांनी आज कौतुकाच थाप टाकली. भारावलेल्या वातावरणात पार पडलेल्या कौतुक सोहळ्याचे अत्यंत कमी वेळेत पण नेटके नियोजन केले. लोकशाही आघाडीचे अध्यक्ष सुभाष पाटील, नेते सौरभ पाटील यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी आयोजीत केलेल्या कार्यक्रमात प्रत्येक विभागाच्या किमान पाच कर्मचारी व अधिकाऱ्यांचा सत्कार घेण्यात आला. 

नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपाध्यक्ष जयवंत पाटील, लोकशाही आघाडीचे अध्यक्ष सुभाष पाटील, आरोग्य सभापती गजेंद्र कांबळे, माजी नगराध्यक्षा शारदा जाधव, नियोजन सभापती विजय वाटेगावकर, नगरसेवक राजेंद्र उर्फ आप्पा माने, युवा नेते जयंत पाटील, सौरभ पाटील, मोहसीन आंबेकरी, सौ. पल्लवी पवार, सौ. सुनंदा शिंदे, सौ. अनिता पवार, सौ. अंजली कुंभार, माजी नगरसेवक मानसिंगराव पाटील, नंदकुमार बटाणे, ए. एन. मुल्ला, अख्तर अंबेकरी, जयंत बेडेकर, सुहास पवार, शिवाजी पवार, शिवलींग नलवडे, अमीत शिंदे, सतीश बोंगाळे, दाऊद आंबोकरी, नाना खामकर आदी उपस्थित होते. 

आमदार पाटील म्हणाले, देशाचे नतृत्व केलेल्या ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिलेल्या विचारांवर येथे काम सुरू आहे. ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील यांच्या दूरदृष्टीने कऱ्हाडचा विकास झाला. त्यांचीही परंपरा येथे सुरू आहे. स्वच्छतेसाठी सगळ्यांचेच एकमत होत आहे, ही अभिनंदनीय बाब आहे. नागरीकांचा सहभाग वाढविण्यात आलेल्या यशामुळेच देशात पहिला क्रमांक आला. लोकप्रतिनिधीही आपल्या गावाचे नाव व्हावे, यासाठी या मोहिमेत हिरीरीने सहभाग घेतला. त्यामुळेच सफाई कामगारांसह पालिकेच्या अधिकाऱ्यांनाही हुरूप आला. त्या सगळ्याचा परिणाम म्हणूनच आज कऱ्हाडचा देशात पहिला क्रमांक आला आहे.

कचऱ्याची समस्या मोठी आहे. ती सध्या अनेक शहरांमध्ये डोकेदुखी ठऱते आहे. अशी स्थिती असताना आपण त्या समस्येवर उपाय शोधण्यात यशस्वी झाला, ही बाब विशेष उल्लेखनीय आहे. स्वच्छता झाली आता त्यात सातत्य राखण्याचेही प्रयत्न व्हावेत. त्यासाठीही वेगळा आराखडा करून त्यातही लोक सहभाग घ्यावा. यावेळी नगराध्यक्षा सौ. शिंदे, उपाध्यक्ष पाटील, माजी ज्येष्ठ नगरसवेक मानसिंगराव पाटील, ए. एन. मुल्ला, सौरभ पाटील, भूषण जगताप यांची भाषणे झाली. आरोग्य़ विभागाच्या सर्वच कर्मचाऱ्यांचा सत्कार आमदार पाटील यांच्या हस्ते झाला. प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांसह प्रातिनिधिक स्वरूपात किमान पाच कर्मचाऱ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. विशेष प्रयत्नाबद्दल माजी आऱोग्य सभापती विजय वाटेगावकर, विद्यमान सभापती गजेंद्र कांबळे, नगराध्यक्ष सौ. रोहिणी शिंदे व उपाध्यक्ष जयवंत पाटील यांचाही सत्कार झाला. ए. आऱ. पवार यांनी सुत्रसंचालन केले. 

सफाई कर्मचाऱ्यांचा रोख स्वरूपात बोनस द्यावा 
कऱ्हाड पालिका देशात पहिली आली आहे. त्यामुळे त्याच्या बक्षीसाचा आकडाही मोठा असेलही. ते बक्षीस येईल मात्र त्या पूर्वीच देशात कऱ्हाडचा लौकीक वाढविणाऱ्या व अहोरात्र कऱ्हाडच्या स्वच्छतेसाठी झटणाऱ्या पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना रोख स्वरूपात बोनस म्हणून काही बक्षीस पालिकेने निश्चित द्यावा, तसा ठराव घेवून त्याची अंमलबजावणी करावी, अशी सुचना माजी ज्येष्ठ नगरसेवक मानसिंगराव पाटील यांनी भाषणात मांडली. त्याचे उपस्थित कर्माचऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com