आमदार जयकुमार गोरे यांना कोणत्याही क्षणी अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जानेवारी 2017

सातारा: विनयभंग व व्हॉट्‌सऍपवर अश्‍लील पोस्ट टाकल्याच्या गुन्ह्यामध्ये माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांचा अटकपूर्व जामिन अर्ज उच्च न्यायालयानेही आज (सोमवार) फेटाळला. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयात अपील करेपर्यंत अटकेला मुदत मिळण्याचा अर्जही न्यायमूर्ती साधना जाधव यांनी फेटाळल्याने गोरे अडचणीत आले आहेत.

सातारा: विनयभंग व व्हॉट्‌सऍपवर अश्‍लील पोस्ट टाकल्याच्या गुन्ह्यामध्ये माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांचा अटकपूर्व जामिन अर्ज उच्च न्यायालयानेही आज (सोमवार) फेटाळला. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयात अपील करेपर्यंत अटकेला मुदत मिळण्याचा अर्जही न्यायमूर्ती साधना जाधव यांनी फेटाळल्याने गोरे अडचणीत आले आहेत.

वॉट्‌सऍपवरून अश्‍लिल मेसेज पाठवून तसेच शरीरसंबंधांची मागणी करून गोरे यांनी विनयभंग केल्याची तक्रार येथील एका महिलेने शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. या गुन्ह्यामध्ये अटकपूर्व जामिन मिळावा यासाठी गोरे यांनी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता. अनेक दिवसांच्या युक्तिवादानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्षा मोहिते यांनी त्यांचा जामिन अर्ज फेटाळला. या वेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील हे गोरे यांच्या अटकेसाठी न्यायालयाबाहेर हजर होते. मात्र, गोरे यांच्या वतीने उच्च न्यायालयात अपिलासाठी जाईपर्यंत मुदत मिळावी याबाबतचा अर्ज करण्यात आला. त्यावर सुनावणी झाल्यानंतर न्यायाधीश मोहिते यांनी त्यांना दोन जानेवारीपर्यंत मुदत दिली होती.

या दरम्यान गोरे यांनी 29 डिसेंबर रोजी उच्च न्यायालयात अपील केले. त्यावर आज न्यायमूर्ती साधना जाधव यांच्यासमोर सुनावणी झाली. सहायक सरकारी अभियोक्ता अरबान सैत यांनी सरकार पक्षातर्फे म्हणणे मांडले. गुन्ह्याची कागदपत्रे, जप्त केलेला मुद्देमाल व गोरे यांनी पाठविलेले मेसजचे न्यायमूर्तींनी अवलोकन केले. त्यानंतर तपासी अधिकारी बी. आर. पाटील यांनी दिलेला अहवालही न्यायालयाने वाचला. साक्षीदारांवर दबाव येऊ शकतो त्यामुळे जामिन फेटाळण्याची मागणी त्यामध्ये श्री. पाटील यांनी केली होती. वरील कागदपत्रे व सरकारी वकीलांचा युक्तिवाद ग्राह्य मानत न्यायमूर्तींनी गोरे यांचा जामिन अर्ज फेटाळला.

जामिन अर्ज फेटाळल्यानंतर जिल्हा न्यायालयाप्रमाणेच सर्वोच न्यायालयात अपिलासाठी जाण्यासाठी संधी मागणी करणारा अर्ज गोरे यांच्या वतीने न्यायमूर्तींसमोर दाखल करण्यात आला. तपासी अधिकाऱ्यांच्या अहवालाचे अवलोकन व इतर कागदपत्रांचा विचार करून न्यायमूर्ती श्रीमती जाधव यांनी गोरे यांचा तो अर्जही फेटाळला. त्यामुळे गोरे यांना आता अटकेपासून मिळालेले संरक्षण आज संपुष्टात आले.

Web Title: mla Jayakumar Gore arrested at any moment