
इस्लामपूर : प्रशासकीय कारकीर्द सुरू होण्यापूर्वी शहराच्या राजकारणातील पालिकेत विरोधी विकास आघाडीने प्रस्थापित केलेले वर्चस्व नंतरच्या काळातही काहीअंशी टिकून आहे. माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रयत क्रांती संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणखी वाढत आल्याचे दिसते आहे. मागील निवडणुका झाल्या, तेव्हा इस्लामपूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात सर्वपक्षीय विकास आघाडी या लढतीत तत्पूर्वीच्या २५ वर्षांच्या आमदार जयंत पाटील यांच्या सत्तेला शह देत समान सत्ता बळकावली. थेट नगराध्यक्षपद विकास आघाडीकडे गेल्याने साहजिकच विकास आघाडीचे वर्चस्व निर्माण झाले. नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी पाच वर्षांच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ताकाळात केलेले कारनामे उघडकीस आणताना राष्ट्रवादीला जेरीस आणले.