Jayant Patil : भुंकणारे भुंकतच राहतात : आमदार जयंत पाटील; आमदार पडळकरांवर टीका

Sangli News : सांगली जिल्ह्यात कोणत्याही सभा किंवा कार्यक्रमात हे वाक युद्ध सुरू आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांनी पडळकर यांना ‘जशास तसे उत्तर देऊ,’ असा इशारा दिला आहे.
"MLA Jayant Patil slams MLA Padalkar, saying 'Barking Dogs Keep Barking,' adding fuel to the political debate."
"MLA Jayant Patil slams MLA Padalkar, saying 'Barking Dogs Keep Barking,' adding fuel to the political debate."Sakal
Updated on

सांगली : ‘भुंकणारे भुंकतच राहतात, आपण आपल्या चालीनं चालायचं असतं,’ असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज आमदार गोपीचंद पडळकर यांना लगावला. कालच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील नेतृत्व करीत असलेल्या सांगली जिल्हा बँकेत भ्रष्टाचाराचा आरोप केला. तसेच जयंत पाटील यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली होती. गेले काही दिवस दोघांमध्ये जोरदार टीकायुद्ध सुरू असून त्याचे पडसाद मुंबईत विधिमंडळ अधिवेशनादरम्यानही उमटत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com