
सांगली: ‘‘ज्यांना सोबत थांबायचे आहे ते थांबतील, बाकीचे जातील. पण, माझा एक प्रॉब्लेम आहे, समोरून विरोध होत नाही, तोपर्यंत मी शांत असतो. जेव्हा विरोध सुरू होतो, त्या वेळी माझ्यातला ‘ओरिजनल’ माणूस जागा होतो. त्यामुळे ‘थोडं थांबा आणि बघा पुढं काय होतंय,’’ असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी विरोधकांना दिला.