मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा खासदार महाडिकांना विरोध

मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा खासदार महाडिकांना विरोध

कोल्हापूर - लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक यांच्यासाठी आम्ही हाडाची काडं केली. मात्र, श्री. महाडिक यांनी म्हणावे तसे पक्षाला व कार्यकर्त्यांना सहकार्य केले नाही, संपर्कही ठेवला नाही, उलट पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी त्यांनी जवळीक केली. जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीत भाजपचे सारथ्य केले, अशा ढीगभर तक्रारींचा पाढा वाचत कागल येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. 

कागल येथील शाहू सभागृहात मतदारसंघातील ‘राष्ट्रवादी’च्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. बैठकीत २० कार्यकर्त्यांची भाषणे झाली. पण, त्यापैकी १६ जणांनी श्री. महाडिक यांना सहकार्य न करण्याची भूमिका जाहीर केली. पक्षाचे जिल्ह्यातील नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्यासमोर धर्मसंकट आहे, त्यामुळे आपल्याला असे काही करता येणार नाही, असे सांगत जिल्हा बॅंकेचे संचालक प्रताप ऊर्फ भय्या माने, जिल्हा परिषदेचे सदस्य युवराज पाटील यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण, त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.  

‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे श्री. महाडिक यांनी काही तक्रारी मांडलेल्या आहेत, याबाबतही बैठकीत चर्चा झाली. यावर बोलताना आमदार मुश्रीफ म्हणाले, की राष्ट्रवादी पक्ष आणि आमचे नेते शरद पवार हे जो उमेदवार देतील तो विजयी होण्यासाठी मला प्रयत्न करावे लागणार ही माझी एक बाजू. तर, तुम्हा सगळ्या कार्यकर्त्यांचा विरोध ही दुसरी बाजू. या दोन बाजूंच्या मध्ये मी अडकलेलो आहे. यातून योग्य मार्ग काढावा लागेल. या वेळी कागल, गडहिंग्लज, उत्तूर या भागातील कागल विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने 
उपस्थित होते. 

माध्यमांना निमंत्रण नाही
एरवी माध्यमांच्या प्रतिनिधींनाच घेऊन फिरणाऱ्या श्री. मुश्रीफ व त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी या बैठकीपासून माध्यमांच्या प्रतिनिधींना जाणीवपूर्वक बाजूला ठेवले. बैठकीत श्री. महाडिक यांना विरोध होणारी भाषणे होतील म्हणूनच ही खबरदारी घेण्यात आल्याचे समजते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com