अपनोंके लिए रोशनी देती हूं, तो दुसरोंको जला भी सकती हूं....

अपनोंके लिए रोशनी देती हूं, तो दुसरोंको जला भी सकती हूं....


सोलापूर : ``मै हू शमा, जो रोशनी बिखरती हूं, अपनोंके (स्वपक्षीय) लिए रोशनी देती हूं, तो दुसरोंको (विरोधी पक्ष) जला भी सकती हूं``, असे सांगतानाच आगामी काळात सोलापूर महापालिकेतील सत्तेबाबातची भविष्यवाणी आमदार प्रणिती शिंदे यांनी आज (रविवारी) येथे केली. 

आमदार शिंदे यांच्या भाषणाबाबत उत्सुकता
आमदार शिंदे यांचा मंत्रीमंडळात समावेश झाला नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या समर्थकांनी राजीनामे देण्यापासून निरीक्षक मल्लिकार्जुन खर्गे
यांचा पुतळा जाळण्यापर्यंत आंदोलने केले. त्याची वरिष्ठांनी दखल घेतल्यानंतर माफीही मागितली. या पार्श्वभूमीवर ही बैठक झाल्याने आमदार शिंदे काय बोलतात
याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. पाठिशी राहिल्याबद्दल कार्यकर्त्यांना धन्यवाद देतानाच, खर्गे यांच्यासंदर्भात झालेल्या घटनेबद्दल त्यांची माफीही मागितल्याचे
सांगितले. श्रेष्ठींना सर्वंकष विचार करावा लागतो, त्यामुळे पक्षाने घेतलेल्या निर्णयाबद्दल नाराज नसल्याचे त्यांनी भाषणाच्या सुरवातीलाच स्पष्ट केले. 

महापालिकेवर  झेंडा फडकेल
पक्षाने माझ्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय केला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी नाराज न होता पक्ष मजबूत करण्यासाठी कामाला लागावे. दीड वर्षांनंतर महापालिकेची
निवडणूक होणार आहे. मला खात्री आहे की या निवडणुकीत सोलापूर महापालिकेवर आपलीच सत्ता येईल, मात्र त्यासाठी गरज आहे आपण एकत्रित येण्याची. आताही
नगरसेवकांचा निधीचा प्रश्न आहे तो मिळवण्यासाठी आता नश्चित प्रयत्न करूयात, असेही आमदार शिंदे म्हणाल्या. निधी आणि एमआयडीसीतील प्रश्न तसेच अनेक
प्रलंबित कामे आता मार्गी लागणार आहेत. स्थानिक भागातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आता रस्त्यावर उतरून आंदोलने करण्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या.     

नेत्यांबद्दल मनात नेहमीच आदर...
पक्षातील नेत्यांबद्दल मला नेहमीच आदर वाटत राहिला आहे, आताही आहे. मला मंत्रीपद मिळावे यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले. मात्र पक्षाच्या श्रेष्ठींना सर्वंकष विचार करून निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे नेत्यांच्या निर्णयाचा आदर आपण सर्वांनीच केला पाहिजे आणि आगामी काळात पक्ष मजबूत करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत, असेही आमदार शिंदे म्हणाल्या. 

चला पाहूया काय म्हणाल्या प्रणिती शिंदे...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com