म्हैसाळचे पाणी हे आमच्या सरकारच्या प्रयत्नाने : परिचारक

Prashant Paricharak
Prashant Paricharak

मंगळवेढा : 35 गावाला निधी देण्याचा शब्द आपण दिलेला नाही. परंतु म्हैसाळचे पाणी हे आमच्या सरकारच्या प्रयत्नाने आले आहे, असा दावा विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी नंतर तालुक्यामध्ये सुरु असलेल्या जनावरांच्या छावण्या व जळालेल्या फळबागाची आज पालकमंत्री विजयकुमार देशमुख व आ. प्रशांत परिचारक यांनी डिकसळ भाळवणी जालीहाळ हाजापूर  खुपसंगी लेंडवेचिंचाळे आदी गावातील पाहणी केल्यानंतर कारखान्यावर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, जिल्हा बँकेचे संचालक बबनराव आवताडे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत चव्हाण,राजेंद्र सुरवसे येताळा भगत औदुंबर वाडदेकर चंद्रशेखर कौडूभैरी आदींसह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना परिचारक म्हणाले, की छावणीतील गैरप्रकारास आळा घातल्यामुळे छावणीतील जनावरांना पुरेशा प्रमाणात चारा व पशुखाद्य मिळू लागले असून, निवडणुकीतील आचारसंहितेमुळे छावण्या सुरू झाल्या नसल्या आता सध्या तालुक्यामधील वीस हजारांपेक्षा अधिक पशुधन छावण्यांमध्ये दाखल झाले. मागील सरकारच्या कामगिरी पेक्षा या सरकारची कामगिरी जनतेचे प्रश्न सोडवणेमध्ये उत्तम आहे. म्हैसाळचे पाणी शिरनांदगी तलावांमध्ये सोडण्याची तरतूद मूळ आराखडामध्ये नाही, तरीही दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन सध्या पाणी सोडले जात आहे. चालवण्याची क्षमता 18 क्युसेक्स असून या क्षमतेने हे तलाव पूर्ण पुर्ण भरण्यास शंभर दिवस लागतील. एवढे दिवस पाणी राहण्याची शक्यता कमी आहे. कालव्याची 50 क्युसेक्स असणे आवश्यक आहे, पण गेल्या दहा वर्षात याकडे लक्ष देणे आवश्यक होते. आता लाईनिंग केली असून आम्ही याबाबत मागणी केल्यावर अधिकाऱ्यांनी यावर केलेले खर्च वाया जाणार असल्याचे सांगितले.

दौय्रा दरम्यान भाळवणी येथील जबरदस्त चौगुले यांनी छावणीमध्ये चारा पाणी व्यवस्थित मिळत असल्याचे सांगितले, तर काही शेतकऱ्यांनी दुष्काळ निधीतील फळबागांची रक्कम दिली नसल्याचे सांगितले. पाण्याचा टँकर सुरू असून वाडी-वस्तीवर रस्ता नसल्याने टॅंकरचे पाणी मिळत नाही. तात्पुरते स्वरूपात रस्ता देण्याचे तहसीलदारांना आदेश द्यावेत अशी मागणी केली. मधुकर चव्हाण यांनी पिक विमा भरपाई देताना तुरीची रक्कम मिळाली नसल्याचे सांगितले. रामचंद्र सारवडे यांनी कांद्याचे अनुदान लवकर देण्याची मागणी केली खुपसंगी येथे गणपत लवटे यांनी फळबागांचे नुकसान भरपाई दोन महसूल मंडलला वेगवेगळी दिली जाते.अशी तक्रार केली.

छावणीतील जनावराला चारा व्यवस्थित मिळत नसल्याचा प्रश्न उपस्थित केला असता पालकमंत्री विजयकुमार देशमुख म्हणाले, की आज भेटी दिलेल्या जनावरांच्या छावण्यांमध्ये पशुपालकांनी चारा पाणी पशुखाद्य व्यवस्थित मिळत असल्याने समाधान व्यक्त केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com