आमदार राहूल जगताप यांची निवडणुकीतून माघार

संजय काटे
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

श्रीगोंदे (नगर) : श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांस झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर आज राष्ट्रवादी कॉंग्रेसला पुन्हा एक जोरदार धक्का बसला. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार राहूल जगताप यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेवून माघार घेतली आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर जगताप यांनी एक पाऊल मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. श्रीगोंदे मतदारसंघातून त्यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते घन:श्‍याम शेलार यांच्या उमेदवारीची शिफारस पक्षश्रेष्ठींकडे केल्याची माहिती आहे.

माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना भाजपाचे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तालुक्‍यातील सगळी समिकरणे बदलून गेली. नगर तालुक्‍यातील मतदारसंघाला जोडलेल्या दोन गटात भाजप आणि शिवसेनेचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे जगताप यांच्यासह कॉंग्रेसच्या अनुराधा नागवडे या भाजपची उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात होत्या. परंतु पाचपुते यांनी त्यात बाजी मारली. उमेदवारी मिळाली नाही तरी राजेंद्र नागवडे यांनी भाजपाशी जवळीक कायम केली. कॉंग्रेस आघाडीला हा धक्का अजून पचविता येत नसतानाच निवडणुकीतून आमदार जगताप यांनी माघार घेत कार्यकर्त्यांना दुसरा धक्का दिला.

जगताप यांच्यासह बाबासाहेब भोस, अण्णा शेलार, माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे, पक्षाचे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के यांच्या झालेल्या बैठकीत घन:श्‍याम शेलार यांना पक्षाने उमेदवारी द्यावी, यावर एकमत झाले. शेलार यांच्या नावाची शिफारस पक्षाकडे पाठवले असल्याचे समजते. या सगळ्या घडामोडीनंतर श्रीगोंद्यात भाजपाचे बबनराव पाचपुते विरुद्ध कॉंग्रेस आघाडीचे घन:श्‍याम शेलार यांच्यात लढाई होण्याचे जवळपास निश्‍चित झाले.

नागवडे यांचा उमेदवारीला नकार..!
दरम्यान भोस म्हणाले, आम्ही आज सकाळी राजेंद्र नागवडे यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांनी आघाडीची उमेदवारी करावी असे सुचविले. मात्र त्यांनी नकार दिल्याने शेलार यांचे नाव अंतिम करीत पक्षातील वरिष्ठांना कळवीत आहोत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Rahul Jagtap withdraws from election