आमदार संग्राम जगताप यांचा जामीन मंजूर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जुलै 2018

नगर : केडगाव दुहेरी हत्याकांडातील आरोपी आमदार संग्राम जगताप यांच्यासह एकाला न्यायालयाने अटीशर्तीवर जमीन मंजूर अर्ज केला. महापालिका पोटनिवडणुकीच्या निकालानंतर दोन शिवसैनिकांची हत्या झाली होती.

नगर : केडगाव दुहेरी हत्याकांडातील आरोपी आमदार संग्राम जगताप यांच्यासह एकाला न्यायालयाने अटीशर्तीवर जमीन मंजूर अर्ज केला. महापालिका पोटनिवडणुकीच्या निकालानंतर दोन शिवसैनिकांची हत्या झाली होती.

याप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण शाखेने काल आठ जणांविरूद्ध दोषारोपपत्र सादर केले. त्यात आमदार संग्राम जगताप व बाळासाहेब एकनाथ कोतकर यांच्यावरील गुन्हा तपासण्यावर ठेवला. त्यामुळे आज आमदार जगताप व बाळासाहेब कोतकर यांच्या जामीनासाठी आज सकाळी वकिलांनी प्रथम वर्ग न्यायालयात जामीनासाठी अर्ज ठेवला होता. त्यावर सुनावणी झाल्यानंतर प्रथम वर्ग न्यायाधीश सोनल पाटील यांनी प्रत्येकी 15 हजार रूपयांच्या जातमुचलका व तपासात सहकार्य करण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला.  
आरोपीतर्फे अॅड. महेश तवले, अॅड. प्रसन्ना जोशी यांनी काम पाहिले.

Web Title: MLA Sangram Jagtap bail granted