संग्राम जगताप शिवसेनेत जाणार नाहीत, पण राष्ट्रवादीत तरी राहणार का?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जुलै 2019

माझी व शिवसेनेच्या कोणत्याही मंत्र्यांशी भेट झालेली नाही. आणि मी शिवसेनेत जाण्याचा प्रश्नच येत नाही. कुणीतरी सोशल मीडियावर वावड्या उठवल्या आहेत,'' असे स्पष्टीकरण आमदार संग्राम जगताप यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिले. जगताप यांनी हे स्पष्टीकरण दिले असले तरी आपण राष्ट्रवादीतच राहणार, असे आवर्जून सांगितले नाही. त्यामुळे त्यांच्या आगामी हालचालींविषयी उत्सुकता राहणार आहे. 

पुणे : ''माझी व शिवसेनेच्या कोणत्याही मंत्र्यांशी भेट झालेली नाही. आणि मी शिवसेनेत जाण्याचा प्रश्नच येत नाही. कुणीतरी सोशल मीडियावर वावड्या उठवल्या आहेत,'' असे स्पष्टीकरण आमदार संग्राम जगताप यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिले. जगताप यांनी हे स्पष्टीकरण दिले असले तरी आपण राष्ट्रवादीतच राहणार, असे आवर्जून सांगितले नाही. त्यामुळे त्यांच्या आगामी हालचालींविषयी उत्सुकता राहणार आहे. 

लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून भाजपच्या सुजय विखे यांच्याविरोधात लढत दिलेले जगताप सध्या राष्ट्रवादीच्या नेत्यांपासून दूर आहेत. रोहित पवार हे नगरमध्ये असताना या दोघांची भेट झाली नव्हती. तेव्हापासूनच ते पक्षावर नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. एवढेच नाही तर ते शिवसेनेच्या नेत्यांनाही भेटल्याचे सांगणयात येऊ लागले.  

मागील आठवड्यात शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांची राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी भेट घेतली व ते शिवसेनेत जाणार, अशी पोस्ट सोशल मीडियावर (सरकारनामा नव्हे) व्हायरल झाली होती. याबाबत आमदार जगताप यांना पत्रकारांनी छेडले असता ते म्हणाले, ''मी शिवसेनेत जाण्याचा प्रश्नच येत नाही. माझी व कोणत्याही शिवसेनेच्या नेत्याची भेट झालेली नाही. काही बोलणेही झालेले नाही. असे असताना सोशल मीडियावर कुणीतरी पोस्ट टाकून वातावण ढवळले आहे. मी शिवसेनेत जाणार नाही,'' असे आमदार जगताप यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA sangram Jagtap Clarifies he does not enter in Shivsena