आयुक्तालय प्रस्तावावर कार्यवाही का नाही - सतेज पाटील 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जून 2019

कोल्हापूर - गेल्या वीस वर्षापासून कोल्हापुरातील आयुक्तालयाचा प्रश्न प्रलंबित आहे. आयुक्तालयाच्या प्रस्तावावर काय कार्यवाही केली आहे ?  असा तारांकित प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी अधिवेशनात उपस्थित केला आहे. तसेच कार्यवाही झाली नसल्यास विलंबन का केले जात नाही, असेही ते म्हणाले. 

यावर वित्त विभागाने उपस्थित केलेल्या काही मुद्द्यांची माहिती पोलीस महासंचालक कार्यालयाकडून येणार आहे. यानंतर पुढील कार्यवाही होईल असे उत्तर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

श्री. पाटील म्हणाले,  कोल्हापूर जिल्ह्यात संघटित गुन्हेगारी वाढत आहे. याशिवाय खून, दरोडा, मारामाऱ्या, लुटीच्या घटना नित्याच्या झाल्या असल्याने गुन्हेगारीचा आलेखही चढता आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात पोलीस पोलीस आयुक्त कार्यालयाची मागणी गेल्या 20 वर्षा पासून होत आहे. आयुक्तालय झाल्यास गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे शक्य होणार आहे. आयुक्तालयाचा प्रस्ताव गेल्या वीस वर्षापासून प्रलंबित आहे.  

आयुक्त कार्यालयाबाबतचा प्रस्ताव पोलीस महासंचालक कार्यालयाने वित्त विभागाला दिला आहे. वित्त विभागाने यावर काही मुद्दे उपस्थित केले. या मुद्द्यांची सविस्तर माहिती सादर करण्याच्या सूचना पोलिस महासंचालक कार्यालयाला दिलेल्या आहेत. पुढील कार्यवाही लवकरच होईल.

-  देवेंद्र फडणवीस,  मुख्यमंत्री 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Satej Patil comment in assembly