शिवेंद्रसिंहराजेंनी उठवला अजित पवारांपूढे जाेरदार आवाज

शिवेंद्रसिंहराजेंनी उठवला अजित पवारांपूढे जाेरदार आवाज

सातारा :  सातारकरांसाठी वरदाता असलेल्या कास धरणाची उंची वाढवण्याचे काम निधी नसल्याने रखडलेले आहे. हा महत्वकांक्षी प्रकल्प पुर्ण व्हावा. तसेच तात्पुरत्या स्वरुपात सुरु करण्यात आलेल्या मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश प्रकिया सुरु करावी. छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्राहालयाच्या इमारतीचे काम पुर्ण करुन संग्राहालय तातडीने जनतेसाठी खुले करावे. किल्ले सज्जनगडावर परळी येथून रोप वे करवा यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे येथे झालेल्या बैठीकीत जोरदार आवाज उठवला.

पुणे विभागातील जिल्हा नियोजन समितीचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच घेतला. सातारा जिल्ह्यासाठी झालेल्या बैठकीस पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार, विभागीय आयुक्त दिपक म्हैसकर, जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि संबंधीत सर्व अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा - ...तर पुन्हा देशात नोटाबंदीसारख्या रांगा लागतील

या बैठकीत शिवेंद्रसिंहराजेंनी सातारकरांचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न असलेल्या कास धरणाच्या उंची वाढवण्याच्या कामासाठी आवश्यक असणारा उर्वरीत निधी तातडीने मंजूर करण्याची जाेरदार मागणी केली. महाराष्ट्र सुजल व निर्मल अभियानांतर्गत सातारा शहरास पाणीपुरवठा करणार्‍या कास धरणाची उंची वाढवणे या भांडवली कामास उर्वरीत अनुदान वितरीत करणे व निधीची अर्थसंकल्पात तरतूद करण्याची मागणीही शिवेंद्रसिंहराजेंनी मंत्री पवार यांच्याकडे केली. या कामासाठी आवश्यक असणारे उर्वरित अनुदान १८ कोटी रुपये तातडीने पालिकेस मिळावे. तसेच सुधारीत प्रकल्प अहवालानुसार वाढीव रक्कम ४२ कोटी रुपयांच्या तरतूदीसाठी पुरवणी मागणी मंजूर करुन निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात यावी असेही शिवेंद्रसिंहराजेंनी नमूद केले. या कामासाठीचा तातडीचा १८ कोटी रुपये निधी त्वरीत मंजूर करुन उपमुख्यमंत्री पवार यांनी पुरवणी मागणीच्या निधीची अर्थसंकल्पात तरतूद करण्याच्या सुचना उपस्थित अधिकार्‍यांना केल्या.

हेही वाचा - #SSCL निर्मलाची शानभाग वर मात; पोदारचा धावांचा पाऊस

महाबळेश्‍वर, किल्ले अजिंक्यतारा, कास पठार, ठोसेघर, भांबवली धबधबा, बामणोली, सज्जनगड आदी पर्यटनस्थळांमुळे वर्षभर महाराष्ट्रातूनच नव्हे तर, देश आणि परदेशातूनही सातार्‍यात पर्यटकांची ये-जा सुरु असते. किल्ले  सज्जनगड याठिकाणी दासनवमी, रामनवमी, गुरुपौर्णिमा यासह वर्षभर धार्मिक कार्यक्रम व दासबोध शिबीरांचे आयोजन होत असते. त्यामुळे वयोवृध्द भावीक पर्यटकांची संख्या जास्त असते. सज्जनगडावर येणार्‍या पर्यटकांची सोय व्हावी यासाठी परळी ते सज्जनगड रोप वे सुरु करणे आवश्यक आहे. या प्रस्तावास जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिली असून हा प्रस्ताव राज्य शासनाच्या पर्यटन विभागाकडे पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावास तातडीने मंजूरी देवून निधी उपलब्ध करुन द्यावा.

सातारा येथे छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्राहालयाच्या इमारतीचे काम पुर्णत्वास गेलेले आहे. इमारतीतील फर्निचर, रंगकाम व इतर तत्सम कामे शिल्लक असून ही कामे निधी अभावी रखडलेली आहेत. एक सुसज्ज वास्तू संग्राहलय जनतेसाठी लवकरात लवकर खुले व्हावे, यासाठी तातडीने उर्वरीत कामांसाठीचा निधी मंजूर करावा अशी मागणी शिवेंद्रसिंहराजेंनी केली. या दोन्हीसाठी तातडीने निधीची तरतूद करण्याच्या उपमुख्यमंत्री पवार यांनी उपस्थित अधिकार्‍यांना केल्या.

हेही वाचा - गुरुकुलच्या विजयात शार्दुल, आर्य, अद्वैतची कामगिरी

सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत जागेअभावी रखडलेली आहे. जागेचा प्रश्‍न सुटेल तेव्हा सुटेल, तोपर्यंत जिल्हा रुग्णालयात तात्पुरत्या स्वरुपात मेडीकल कॉलेज सुरु करावे असा आग्रह शिवेंद्रसिंहराजेंना केला. त्यानुसार जिल्हा रुग्णालयात तात्पुरत्या स्वरुपात मेडीकल कॉलेज सुरु करण्यासाठी पदनिश्‍चिती आणि पदनिर्मीती करण्यात आली. दरम्यान, प्रत्यक्षात मेडीकल कॉलेज सुरु करण्यासाठी आणि जिल्ह्यातील तरुणांसाठी वैद्यकीय शिक्षणाची कवाडे खुली करण्यासाठी प्रथम वर्ष प्रवेश प्रकिया सुरु करावी, अशी आग्रही मागणी शिवेंद्रसिंहराजेंनी मंत्री पवार यांच्याकडे केली. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून सातार्‍यात मेडीकलच्या प्रथम वर्षाचे शिक्षण सुरु करण्यासाठी मंत्री पवार यांनी सकारात्मकता दर्शवली.

नक्की वाचा - Video : मी पुन्हा येईनने नेटकऱ्यांत घातला धुमाकूळ

याशिवाय सातारा येथील देगाव टप्पा क्रमांक तीन एम.आय.डी.सी. च्या भुसंपादनाची प्रक्रीया प्रलंबीत आहे. सदर एम.आय.डी.सी. उभी राहिल्यास औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे सदर प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाची प्रक्रीया लवकरात लवकर सुरु करण्यासाठी आपल्या अध्यक्षतेखाली उद्योगमंत्री आणि औद्योगिक व महसूल विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक बोलावून हा प्रश्‍न मार्गी लावावा, अशी मागणीही शिवेंद्रसिंहराजे यांनी केली. यासाठीही मंत्री पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com