पेड ते राजभवन...आमदार सुरेश खाडेंची लकाकती वाटचाल

पेड ते राजभवन...आमदार सुरेश खाडेंची लकाकती वाटचाल

दोनवेळच्या पोटापाण्याची चिंता असलेल्या खाडे कुटुंबातील सुरेशभाऊंचे पाय तीनवेळा आमदार झाल्यानंतरही जमिनीवरच राहिले. एखाद्या गावाच्या भेटीला गेले आणि काहीही न देता परतले, असे झालेच नाही. त्यातून जनसामान्यांशी घट्ट वीण तयार झाली. त्यातूनच सलग तीनवेळा भाजपचे आमदार म्हणून निवडून येण्याची लकाकती कामगिरी त्यांनी केली.

तासगाव तालुक्‍यातील पेडसारख्या छोट्या गावातून बाहेर पडून मुंबई गाजवणाऱ्या खाडे बंधूंनी उद्योग, राजकारण आणि समाजकारणाच्या क्षेत्रात ध्रुवताऱ्यासारखी कामगिरी केलीय. आमदार सुरेश खाडे यांच्या मंत्रिपदामुळे या कामगिरीवर जणू सोन्याचा कळस चढला. जिल्ह्यातील पहिले भाजप आमदार, मिरज मतदारसंघातील भाजपचे पहिले आमदार, पहिले मंत्री, काँग्रेस उमेदवारांची अनामत जप्त करणारा पहिला भाजप नेता असे बरेच विक्रम आमदार खाडेंच्या नावावर नोंदवले गेलेत. या सर्वांमागे आहे तो पक्का कौटुंबिक पाया, जनसामान्यांशी जपलेली नाळ आणि टोकाची जिद्द.

दोनवेळच्या पोटापाण्याची चिंता असलेल्या खाडे कुटुंबातील सुरेशभाऊंचे पाय तीनवेळा आमदार झाल्यानंतरही जमिनीवरच राहिले. एखाद्या गावाच्या भेटीला गेले आणि काहीही न देता परतले, असे झालेच नाही. त्यातून जनसामान्यांशी घट्ट वीण त्तयार झाली. त्यातूनच सलग तीनवेळा भाजपचे आमदार म्हणून निवडून येण्याची लकाकती कामगिरी त्यांनी केली. 

१ जून १९५८ जन्मदिवस असलेल्या सुरेशभाऊंनी मुंबईच्या व्हीजेटीआय शिक्षणसंस्थेतून वेल्डिंग डिप्लोमा केला. तोदेखील रौप्यपदकासह. सन २००४ मध्ये पहिल्यांदा जत राखीव मतदारसंघातून विधानसभेसाठी  उभे राहीले. २६ हजार मताधिक्‍याने निवडून आले. सन २००९ मध्ये मतदारसंघ बदलला तरीही त्यांच्या विजयाचा वारु मिरजेतही दौडत राहीला. त्यावेळी ते ५४ हजार ५५६ मताधिक्‍याने ते विधानसभेवर निवडले गेले. हा विजय म्हणजे मिरज दंगलीचे प्रॉडक्‍ट अशी टीका होत राहीली. पण ती पुर्णतः खोटी असल्याचे दाखवून देत सन २०१४ च्या निवडणुकीत ते विजयी झाले. खुद्द काँग्रेससह सर्व विरोधी उमेदवारांची अनामत जप्त करण्याचा विक्रम त्यांनी केला.

सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या स्वभावाने शहराबरोबरच ग्रामिण भागातही त्यांनी कार्यकर्त्यांचे जाळे विणले. ४९ पैकी ३७ ग्रामपंचायतींत त्यांच्याच नेतृत्वाखालील सत्ता आहे. मिरज पंचायत समितीवर एकहाती सत्ता आहे. जिल्हा परिषदेतही सात सदस्य पक्षामार्फत पाठवले. शहरातील २७ पैकी १३ नगरसेवक भाजपचे आहेत.

जनसामान्यांच्या सुख-दुःखाशी नाळ जोडल्याने सुरेशभाऊ सर्वांना आपलेसे वाटत राहीले. मुख्यमंत्री निधीसह विविध माध्यमातून रुग्णांसाठी जिल्ह्यात कदाचित सर्वाधिक निधी त्यांनी मिळवून दिला. आजही त्यांच्या कार्यालयात बहुतांशी गर्दी वैद्यकीय मदतीसाठी होताना दिसते. यात मिरजच नव्हे तर अन्य मतदारसंघांतील रुग्णांचाही समावेश आहे. पंढरीच्या विठ्ठलावर निस्सीम भक्ती असलेल्या खाडे कुटुंबातील सुरेशभाऊ जुने दिवस विसरले नाहीत. हीच जाण मंत्रीपदाच्या कारकिर्दीतही निश्‍चित राहील, अशी कार्यकर्त्यांना खात्री आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com