
MLA Vinay Kore addressing the state-level Janasurajya convention in Miraj, declaring alliance with Mahayuti for local bodies.
Sakal
मिरज : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जनसुराज्य युवाशक्ती पक्ष महायुतीसमवेतच असेल. ‘जनसुराज्य’ हा गुलालाचा पक्ष आहे, हे सांगलीने दाखवले आहे. त्याचे उदाहरण सांगली जिल्हा परिषदेत दिसून आले. दोन सदस्य असूनही सांगली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, सभापतिपद मिळवण्याचा मान ‘जनसुराज्य’ने मिळवला. स्थानिक स्वराज्य संस्थांत महायुतीकडे जागांची मागणी करणार असल्याचे संस्थापक आमदार विनय कोरे यांनी आज येथे सांगितले.