
सांगली: ‘महादेवी हत्तीण परत नांदणी मठात यावी, यासाठी जैन समाजासह सर्वधर्मियांनी दाखवलेली एकजूट कौतुकास्पद आहे. ‘महादेवी’ला परत आणण्याच्या लढ्यात आणि ती परत आल्यानंतर सर्वोत्तम सोय करण्यात सक्रिय सहभाग राहील,’ अशी ग्वाही आमदार विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील यांनी आज नांदणी येथे स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य यांच्यासमवेत झालेल्या चर्चेवेळी दिली.