MLA Vishwajit Kadam: मराठ्यांची पुन्हा फसवणूक नको: आमदार विश्वजित कदम; अध्यादेशाप्रमाणे लाभ मिळावा हीच अपेक्षा
Maratha Quota Row: गेल्या काळात शिराळा, वाळवा, तासगाव अशा मतदारसंघांमध्ये विधानसभा निवडणूक काँग्रेस लढली नाही. परिणामी, तेथे पक्ष विस्ताराला संधी मिळाली नाही. या स्थितीत नव्याने बांधणी करावी लागेल. आम्ही त्यावर विचार करतोय.
सांगली: ‘‘मराठा आरक्षणप्रश्नी याआधी काहीवेळा फसगत झाली आहे. मात्र यावेळी तसे होणार नाही, अशी अपेक्षा आहे. राज्य शासनाने काढलेल्या अध्यादेशाप्रमाणे लाभ मिळायला हवेत,’’ अशी अपेक्षा आमदार विश्वजित कदम यांनी आज पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.