मनसेच्या नगरसेवकाचे अपहरण

Mns
Mns

शिर्डी : शिर्डी पालिकेतील नगराध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर राजकारणाला ऊत आला असून, चक्क मनसेच्या नगरसेवकाचे अपहरण करण्यात आले होते. अखेर आज (मंगळवार) नगरसेवकाची सुटका करण्यात आली.

नगरसेवकांची पळवा-पळवी आणि लपवा-छपवी सुरु झाली आहे. मनसे नगरसेवक दत्तात्रय कोते यांचे अपहरण करण्यात आले होते. रात्रीच्या सुमारास हॉटेलमध्ये जेवण करत असताना, त्यांचे अपहरण झाल्याचे सांगण्यात येत आहे.

शिर्डी नगराध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर अपहरणाच्या घटनेनं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. मात्र काही वेळापूर्वीच अपहरण झालेले नगरसेवक दत्तात्रय कोते हे स्वत: पोलिस ठाण्यात हजर झाले. स्वतःहून ते लोणी पोलिस ठाण्यात हजर झाल्याने सुटकेचा निश्वास सोडला. नेमके अपहरण का झाले, ते कोणी केले? याबाबत आता पोलिस तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com