सांगली - महापालिकेतील मनसेचे अस्तित्व संपुष्टात, एकाही जागेवर उमेदवार नाही

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जुलै 2018

सांगली : महापालिका निवडणुकीसाठी 78 पैकी एकाही जागेवर उमेदवार उभा करण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक नेत्यांना अपयश आले आहे. त्यामुळे मनसेचे इंजिन स्टेशनातून बाहेरच पडले नाही. खुद्द पक्षाचे शहरातील चेहरा म्हणवणारे माजी आमदार नितिन शिंदे व मनसेच्या महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्षा स्वाती शिंदे, शहराध्यक्ष अमर पडळकर यांनी भाजप व राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागत "मनसे'ला जय महाराष्ट्र केला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने मनसेचे पालिका क्षेत्रातील अस्तित्वच संपुष्टात आले आहे. 

शिंदे दांम्पत्याने भाजपच्या गोटात हजेरी लावली. प्रभाग 16 मधून ऍड. शिंदे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मनसे निवडणूक लढवण्यास उदासीन आहे. त्यामुळे ते भाजपच्या वाटेवर आहेत. मागील निवडणुकीत मनसेने 36 जागा लढवल्या होत्या. मात्र गेल्या पाच वर्षांत मनसेचे अस्तित्व फारसे शिल्लक नाही. मोजक्‍या आंदोलनापलीकडे फारसे कार्यकर्ते सक्रिय नाहीत. मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्याशी शिंदे यांचा सातत्याने वाद आहे. शिंदे यांच्याकडील सांगली तालुक्‍याचा कार्यभार नाही. त्यांच्याकडे पक्षाची महत्त्वाची पदे आहेत मात्र स्थानिक जबाबदारी नाही अशी अवस्था आहे. 

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यानी माजी आमदार नितीन शिंदेंशी आघाडीबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले होते. मात्र मनसेकडून उमेदवारच नसल्यामुळे श्री. शिंदे यांनी पत्नी स्वाती यांच्या उमेदवारीसाठी चर्चा केली. मनसेकडे प्रभाग 16 मध्ये इतर तीन उमेदवार नाहीत. त्यामुळे ऍड. शिंदे यांनी भाजपात येऊन पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. श्री पडळकर यांनीही शामरावनगर भागात राष्ट्रवादीशी सोयरीक करीत पत्नीसाठी उमेदवारी मिळवली आहे. विद्यमान सभागृहात मिरजेचे शहराध्यक्ष दिगंबर जाधव यांच्या मातोश्री शांताबाई जाधव नगरसेवक होत्या. त्यांनी स्वतःला मनसेच्या नगरसेवक म्हणून जाहीर केले होते. मात्र त्यानंतर त्यांनी कॉंग्रेसशी जुळवून घेत पाच वर्षे काढली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत, आशिष कोरी गेले दोन महिने महापालिकेच्या राजकीय नकाशातून गायब आहेत. निवडणुकीपुर्वी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी महापालिका निवडणूक लढणार असे सांगितले आणि तेव्हापासून ते परत इकडे फिरकलेच नाहीत. 

Web Title: mns not exists in sangali municipal corporation