इस्लामपुरात खासगी सावकारी प्रकरणी मनसे शहराध्यक्षाला अटक

कागदपत्रासह 15 लाखांची रोकड जप्त!
Sunny
SunnyEsakal

इस्लामपूर ( सांगली) : मनसेचा (Maharashtra Navnirman Sena)इस्लामपूर शहराध्यक्ष असलेल्या सचिन ऊर्फ सनी मारुती खराडे (वय ३५, हनुमाननगर, इस्लामपूर) (Sunny Kharade) याला सावकारीप्रकरणी इस्लामपूर (Islampur) पोलिसांनी आज अटक केली. त्याच्याकडून सुमारे १५ लाखांची रोकड व संबंधित कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहेत. अटकेनंतर त्याला आज येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता, २९ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण (Shashikant Chavan)यांनी ही माहिती दिली.

बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता बाजीराव दिनकर पाटील (वय ५४, रक्तपेढीजवळ, इस्लामपूर) यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात सावकारीप्रकरणी तक्रार दिली होती. तपासात सुमारे बारा संशयितांचा सहभाग पुढे आला आहे. या तपासातच सनी खराडेचे नाव पुढे आले. पोलिसांनी माहिती दिली, की अभियंता बाजीराव पाटील यांना व्याजाने दिलेल्या २३ लाख रुपयांपोटी ९५ लाखांची मागणी करीत त्यांच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी संशयित हिंदुराव बबन मोरे (वय ३७, कापुसखेड), बालम हनिद जमादार (वय ४०, वाघवाडी), धैर्यशील संताजीराव पाटील (वय ५६, कामेरी), संभाजी शिवाजी पवार (वय ३८, होळकर डेअरीजवळ, इस्लामपूर) यांना शनिवारी (ता. २५) न्यायालयाने २७ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Sunny
चुकीच्या लोकांना बँकेपासून बाजूला ठेवा; पवारांचा राणेंना टोला

या चौघांशिवाय संशयित जगन्नाथ किसन चिखले (नवेखेड), सुजित पाटील (इस्लामपूर), ज्ञानदेव जाधव (सातवे), पवार (पूर्ण नाव नाही, वाळवा) यासह सांगली शहरातील तीन व्यापारी, इस्लामपूर येथील एक कापड दुकानदार अशा बारा जणांवर इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला आहे.

Sunny
देवराष्ट्रेचा दत्तात्रय पाहतोय महिंद्रा' यांच्या बोलेरोची वाट

पोलिसांचे आवाहन

शहर व परिसरात अनेक ठिकाणी खासगी सावकारी चालते, परंतु लोक तक्रार करत नाहीत. अन्याय सहन करत व्याज भरत बसतात. असे न करता सावकारी करणाऱ्यांविरोधात कुणाची तक्रार असल्यास त्यांनी निर्भयपणे इस्लामपूर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन शशिकांत चव्हाण यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com