Vidhan Sabha 2019 : 'मध्य'सोडून अक्‍कलकोटमार्गे मोहोळला मनेसेचे इंजिन

MNS will elect 3 seats from Solapur district for Maharashtra Vidhansabha 2019
MNS will elect 3 seats from Solapur district for Maharashtra Vidhansabha 2019

सोलापूर : जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघातील तीन जागा लढण्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठरवले असून आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. आता मनसेचे इंजिन अक्‍कलकोटमार्गे मोहोळ, पंढरपुरापर्यंतच धावणार हे निश्‍चित झाले आहे. 

अक्‍कलकोटमधून माजी उपनगराध्यक्ष मधुकर जाधव, मोहोळमधून डॉ. हणुमंत भोसले तर पंढरपूर- मंगळवेढ्यातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी मिळाली आहे. उर्वरित आठ जागांवर मात्र, अद्याप उमेदवार जाहीर झाले नसल्याने मनसेने आघाडीला मदत होईल, असेच नियोजन केल्याचीही चर्चा आहे. शहर मध्य मतदारसंघातील मुस्लीम समाजाला आपलेसं करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न एमआयएमसह कॉंग्रेस, शिवसेना, माकपकडून केला जात आहे. मनसेकडूनही जैनुद्दीन शेख इच्छूक होते मात्र, ही जागा न लढण्याचा निर्णय मनसेकडून घेतल्याची चर्चा आहे.

मनसेने आता मोहोळ, माळशिरस, पंढरपूर- मंगळवेढा या भागात बैठकांचा जोर सुरु केला आहे. उर्वरित जागांवर उमेदवार देण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. दरम्यान, शहर मध्य विधानसभा मतदारसंघात उमेदवार न दिल्याने कोणासाठी हा निर्णय झाल्याचा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

'शहर मध्य'मधून सर्वाधिक मुस्लीम उमेदवार
शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेसकडून प्रणिती शिंदे, शिवसेनेकडून दिलीप माने, माकपतर्फे नरसय्या आडम, एमआयएमतर्फे फारुख शाब्दी, लेबर पार्टीच्या वतीने बशीर अहमद शेख, वंचित बहूजन आघाडीकडून तौफिक शेख, मुस्लीम लिगचा उमेदवार (महाराष्ट्र वंचित आघाडी), प्रहारतर्फे जमीर शेख तर अपक्ष सुमारे पाच ते सहा उमेदवार निवडणूक लढतील असे चित्र आहे. विशेषत: या मतदारसंघात सर्वाधिक उमेदवार मुस्लिम असल्याने दिग्गजांची चिंता वाढल्याची चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com