भालकेंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्याला जमावाने केली मारहाण

0bhelke.jpg
0bhelke.jpg

मंगळवेढा : आमदार भालके यांच्या विरोधात निशेध यात्रा काढून आमदारांची व काॅग्रेस पक्षाची बदनामी केल्याचा राग मनात धरून काॅग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उषोषणकर्ते संतोष माने यांचे कपडे फाडून जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद दाखल करण्यात आली. संतोष माने यांने महिला पदाधिकाऱ्यांशी अश्चील शिवीगाळ केल्याचे परस्परविरोधी गुन्हे दाखल केले.

या घटनेची सविस्तर हकीकत अशी की, दोन दिवसांपासून शहरातील दामाजी चौकात भालके यांच्या विरोधात ३५ गावात कारखान्याच्या कामगारांकडून केलेला खोटा सर्वे, ३५ गावाला बॉक्स कॅनॉलने पाणी येणार म्हणून ३५ गाव परिसरात लाल झेंडे लावणे व पांढरा चुना टाकणे, मराठा आरक्षण आंदोलनावेळी खोटा राजीनामा देणे, या गोष्टींचा जाहीर निषेध  करण्यासाठी आणि या प्रकरणाची माफी मागावी म्हणून गेल्या दोन दिवसापासून धरणे आंदोलन सुरू केले.

शनिवारी सकाळी त्यांने शहरात घोषणाबाजीस सुरुवात केल्याने दामाजी चौकात काँग्रेसचे पदाधिकारी जमावांनी ''तुम्ही भालकेंविषयी असभ्य व आक्षेपार्ह अश्लील भाषेत बोलू नका, आपले मत लोकशाही पद्धतीने मांडा'' असे सांगतिले. तेव्हा, ''मला बोलण्याचा अधिकार आहे. मी त्यांना मतदान केले आहे.''असे सांगितले. दरम्यान, आमदारांची व काॅग्रेस पक्षाची बदनामी करतो म्हणून मारूती वाकडे, संदीप फडतरे, दिग्विजय वाकडे, भिमराव मोरे, नाथा ऐवळे, ज्ञानेश्वर गोवे व अन्य पुरूष व महिलांनी अंगावरील कपडे फाडत मारहाण केली.  आमदाराची पुन्हा बदनामी केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद संतोष माने यांनी दाखल केली. या प्रकारणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पुजारी करत आहेत तर, आंदोलक संतोष माने यांच्यावर ही अश्चील शिवीगाळ केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

सदरचा प्रकार दामाजी चौकात घडला असताना या ठिकाणी असलेला सीसीटीव्ही कॅमेरा बंद असल्याने या प्रकरणाचा तपास करणे पोलिसांना डोकेदुखी ठरणार आहे. जमावानी घटनास्थळी गर्दी केली या घटनेचे व्हिडीओ मात्र निवडणुकीच्या पाश्वभुमीवर सोशलमिडीयात मात्र वेगाने पसरले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com