सेनापती कापशीत मोबाईल चोरटा कॅमेऱ्यात कैद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

सेनापती कापशी - येथील आठवडी बाजारात मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. यापूर्वी अनेक वेळा चोऱ्या झाल्या मात्र काल झालेल्या आठवडी बाजारात चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

सेनापती कापशी - येथील आठवडी बाजारात मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. यापूर्वी अनेक वेळा चोऱ्या झाल्या मात्र काल झालेल्या आठवडी बाजारात चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

इंगळे चौकात इसाक जहरुद्दीन मकानदार यांच्या खिशातून मोबाईल चोरताना चोरटा सीसीटीव्हीत दिसत आहे. काल सायंकाळी पाच वाजता ही घटना घडली. मकानदार हे भाजी घेण्यासाठी वाकले असताना त्यांच्या चेहऱ्यासमोर खिशातून काढलेली पिशवी लावून चोरट्याने त्यांचा साडेसतरा हजार रुपयांचा मोबाईल लांबविला. आणखी चार जणांचे मोबाईल चोरीला गेल्याची चर्चा आहे. यापूर्वी या बाजारात अनेकांचे मोबाईल गेले, मात्र चोरट्यांचा मागमूस लागला नव्हता. कालची चोरी कॅमेऱ्यात कैद झाल्याने चोरट्यांना शोधणे पोलिसांना सोपे जाणार आहे.

Web Title: mobile Thieves captured in CCTV in Senapati Kapshi