अॉनलाईन मोबाईलविक्रीमुळे सॅमसंगचे वितरक झाले अॉफलाईन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

चुकीच्या धोरणांमुले व्यावसायिकांना तोटा सहन करावा लागत आहे. तसेच मनस्तापही होत आहे. वारंवार कळूनही कंपनी असे करीत असल्यानेच विक्रेत्यांनी आंदोलनाचे पाऊल उचलले.

नगर ः ऑनलाइन विक्रीच्या माध्यमातून "सॅमसंग'तर्फे राबविण्यात येणाऱ्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात ऑल इंडिया मोबाईल रिटेलर असोसिएशनच्या माध्यमातून सर्व मोबाईल विक्रेत्यांनी तीन दिवस सॅमसंग मोबाईलची खरेदी, विक्री व पेमेंट बंद ठेवून देशव्यापी बहिष्कार घातला. 

वाडिया पार्क येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर "सॅमसंग'च्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या वेळी "सॅमसंग'चे जिल्हा वितरक व कंपनी अधिकाऱ्यांना व्यापाऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

हेही वाचा - ब्लॅक डायमंड गँगचा नजन ठार

चुकीच्या धोरणांमुले व्यावसायिकांना तोटा सहन करावा लागत आहे. तसेच मनस्तापही होत आहे. वारंवार कळूनही कंपनी असे करीत असल्यानेच विक्रेत्यांनी आंदोलनाचे पाऊल उचलले. 

या प्रसंगी महाराष्ट्र मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजित जगताप, गोरख पडोळे, अजित पवार, संतोष बलदोटा, महेश घावटे, मनीष चोपडा, अविनाश निक्रड, स्वप्नील शेंडे, हिरा धोंडे, आशिष भळगट, भूपेंद्र रासने, संदेश काकडे, मतीन शेख, जावेद शेख, तुषार सुरोशी, अतुल रच्चा आदी उपस्थित होते. या वेळी व्यावसायिकांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mobile vendor agitation against Samsung