...मोदी तसे म्हणालेच नाहीत :  खासदार साबळे 

Modi did not say so : MP Sable
Modi did not say so : MP Sable

सोलापूर : प्रत्येक भारतीयांना 15 लाख रुपये देऊ, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालेच नाहीत, असा खुलासा खासदार अमर साबळे यांनी सोलापुरात केला. मात्र, प्रत्येक भारतीयाला 15 लाख मिळतील इतका परदेशात काळा पैसा आहे, असे मोदी म्हणाल्याचेही त्यांनी सांगितले. विरोधक जनतेत संभ्रम निर्माण करत असल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला. 

आगामी निवडणुकीत समविचारी पक्षांना सोबत घेऊन बहुमताने सत्तेत येण्याची रणनिती भाजपकडून आखली जात आहे. त्या पार्श्‍वभूमीवर खासदार साबळे यांच्याकडे सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्या निमित्ताने ते सोलापूरला आले होते. भाजप अथवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सर्वसामान्य जनतेचा विश्‍वास कायम आहे. विकासाच्या मुद्‌द्‌यांवर विरोधकांना बोलायला तोंड राहिले नाही. त्यामुळे काहीतरी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधक करत असल्याचा आरोप खासदार साबळे यांनी यावेळी केला. 

बेनामी प्रॉपर्टीचा ठराव काँग्रेसच्या काळात झाला परंतु, त्यानंतर 15 वर्षे त्यानुसार काहीच झाले नाही. परंतु, भाजपने पहिल्याच कॅबिनेटमध्ये काळ्या पैशाविरोधात ठराव केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. भ्रष्टाचारमुक्‍त प्रशासन देण्याचा प्रयत्न भाजप सरकारकडून केला जात आहे. जीएसटी मुळे देशाची आर्थिक प्रगतीकडे वाटचाल सुरु झाली आहे तर नोटाबंदीमुळे अतिरेकी कारवायांना आळा बसल्याचे त्यांनी सांगितले.

एक वर्ष निवडणुकीचे तर चार वर्षे विकासाची 
परदेशात एक राष्ट्र एक रस्ता अशी संकल्पना राबविली जाते. त्या पार्श्‍वभूमीवर विकासाला खीळ बसू नये, यासाठी आता एक राष्ट्र एक निवडणूक ही संकल्पना राबविण्याचे नियोजन केले जात आहे. त्यामुळे विकास ठप्प होणार नाही तर दुसरीकडे निवडणुकीच्या खर्चातही बचत होण्यास मदत होईल, असे खासदार अमर साबळे यांनी यावेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com