येत्या काळात मोहोळचा आमदार हा भाजपाचाच झाला पाहिजे : खासदार अमर साबळे

राजकुमार शहा 
रविवार, 18 नोव्हेंबर 2018

मोहोळ  : ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात शेवटच्या घटकापर्यंत लाभ मिळेल अशा आवास, उज्वला  गॅस, पीकविमा अशा अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत . याचा प्रत्यक्ष लाभही तळागाळातील नागरीकांना मिळत आहे . महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही अशाच पद्धतीने चांगल्या योजना राबविल्या आहेत . कार्यकर्त्यांनी आता  मरगळ झटकून कामाला लागले पाहिजे. येत्या काळात मोहोळचा आमदार हा भाजपाचाच झाला पाहिजे यासाठी सर्वानी प्रयत्न करावा.'' , असे प्रतिपादन खासदार अमर साबळे यांनी केले .
   
मोहोळ तालुका भाजपच्यावतीने कुरुल जिल्हा परिषद गटातील मतदान केंद्र  यंत्रणा उभी करण्यासाठी कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष सतिश काळे, संजय क्षीरसागर, अंकुश आवताडे, नगरसेवक सुशील क्षीरसागर,  लिंगदेव निकम,  माऊली जगताप, महेश धुमाळ आदी  उपस्थित होते. यावेळी तालुकाध्यक्ष सतिश काळे यांनी मोहोळ ते मंद्रुप, कुरूल ते पंढरपूर या रस्ताचे काम पुर्ण करावे. तसेच युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी तालुक्यात अन्न प्रक्रिया उद्योग, द्राक्षासाठी शीतगृह, दुध संकलन केंद्राची निर्मिती करावी अशी मागणी केली. कुरुल जिल्हा परिषद गटात एकूण ३३ मतदान केंद्रे  आहेत . यापैकी फक्त  ९ केंद्राचे काम पूर्ण झाले आहे . आगामी काळात कार्यकर्त्यांनी आपापल्या क्षेत्रात कार्यरत राहून मतदान केंद्र यंत्रणा उभी करण्याचे काम करावे असे काळे यांनी सांगितलेे. यावेळी महिलांना उज्वला गॅसचे मोफत वितरण करण्यात आले .
  
Web Title: Mohal MLA should be BJP's candidate in the coming days said MP Amar Sable