BJP Politics : विधानसभा क्षेत्रप्रमुख वनखंडेंना 'या' पदावरुन हटवलं; भाजपाची अंतर्गत धूसफूस चव्हाट्यावर

मोहन वनखंडेंना हटवल्यानंतर या पदावर मालगावचे नेते आणि माजी पंचायत समिती सभापती काकासाहेब धामणे यांची वर्णी लागली आहे.
Miraj Assembly Constituency
Miraj Assembly Constituencyesakal
Summary

पालकमंत्री सुरेश खाडे यांना आव्हान देऊ पाहणाऱ्यांची नावे जिल्हा नियोजनच्या यादीतून वगळण्यात आली होती.

मिरज : मिरज विधानसभा मतदार संघात (Miraj Assembly Constituency) बंडाचा झेंडा फडकावण्याच्या पवित्र्यात असलेल्या मोहन वनखंडे (Mohan Vankhande) यांच्याकडून मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख हे पद काढून घेण्यात आले आहे. त्यांना हटवल्यानंतर या पदावर मालगावचे नेते आणि माजी पंचायत समिती सभापती काकासाहेब धामणे यांची वर्णी लागली आहे.

धामणे हे पालकमंत्री सुरेश खाडे (Suresh Khade) यांचे विश्‍वासू मानले जातात. श्री. वनखंडे यांच्याकडे राज्यातील पद कायम ठेवण्यात आले आहे. मिरजेत भाजपमधील अंतर्गत राजकीय वादाचे पडसाद उमटू लागले आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या निवडीवरून त्याची सुरवात झाली होती. पालकमंत्री सुरेश खाडे यांना आव्हान देऊ पाहणाऱ्यांची नावे जिल्हा नियोजनच्या यादीतून वगळण्यात आली होती.

Miraj Assembly Constituency
Sindhudurg Politics : राज ठाकरेंना मोठा धक्का; 'हा' माजी आमदार मनसेतून बाहेर, राजकारणात उडाली खळबळ

आता मोहन वनखंडे यांना पदावरून हटवत वेगळी चूल मांडू इच्छिणाऱ्यांना खाडे आणि भाजपने अलगद बाजूला केला आहे. वनखंडे यांच्याकडील अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीसपद कायम ठेवले आहे. सध्या भाजपात दोन गट पडले आहेत. त्याचे दर्शन सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमातून झाले आहे. वनखंडे हे पालकमंत्र्यांचे विश्वासू होते. त्यांनी आता मिरज मार्केटमध्ये स्वतःचे स्वतंत्र कार्यालय थाटले आहे.

Miraj Assembly Constituency
'कोणी कितीही प्रयत्न केले, तरी मी भाजपमध्ये जाणार नाही'; माजी उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

गेल्या वर्षभरापासून ते स्वतंत्रपणे शक्तीप्रदर्शन करत आहेत. पालकमंत्र्यांनी श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारून गर्दी खेचत शक्तीप्रदर्शन केले. वनखंडे यांनी प्रभू श्रीरामांची शंभर फुटी रांगोळी रेखाटून व साईनंदन कॉलनीतील श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा करून वेगळे अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न केला. या संघर्षाच्या पुढच्या टप्प्यात ‘कटीपतंग’ खेळ सुरु झाल्याची चर्चा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com