सावकारीच्या जाचातून विष प्यालेल्या बागवानचा मृत्यू 

सावकारीच्या जाचातून विष प्यालेल्या बागवानचा मृत्यू 

मिरज - खासगी सावकारीच्या जाचातून विष प्राशन केलेल्या मोहसिन मलिक बागवान (वय ३०) यांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी माजी नगरसेवक साजिदअली बरकतअली पठाण (वय ४५) याला अटक केली आहे. 

या प्रकरणातील अन्य संशयित आणि साजिदअली पठाणचा भाऊ बबलू हा अद्याप पोलिसांना मिळालेला नाही. याप्रकरणी मोहसिन  बागवानची पत्नी शाहीन बागवान यांनी दिलेल्या तक्रारीवरून मिरज शहर पोलिस ठाण्यात माजी नगरसेवक साजिद पठाण आणि त्याचा भाऊ बबलू पठाण या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे - या प्रकरणातील तक्रारदार शाहीन मोहसिन बागवान यांचा पती मोहसिन मलिक बागवान यांनी साजिद अली पठाण याच्याकडून ५० हजार रुपये कर्ज म्हणून घेतले होते. या कर्जापोटी त्यांनी १ लाख ७५ हजार रुपयांची रक्कम  व्याज म्हणून पठाण याला दिली़, तरीही पठाण याने मुद्दलाचे पन्नास हजार रुपये देण्यासाठी मोहसिन बागवान यांना सातत्याने त्रास देण्यास सुरवात केली. या त्रासास कंटाळून मोहसिन बागवान यांनी शहर पोलिस ठाण्यात साजिदअली पठाण आणि त्याचा भाऊ बबलू पठाण या दोघांविरोधात तक्रार दिली.

ही तक्रार दाखल झाल्यानंतरही साजिदअली पठाण आणि बबलू पठाण यांनी मोहसिन बागवान याला मारहाण करून तक्रार मागे घेण्यासाठी धमकावण्यात सुरवात केली. याच त्रासास कंटाळून मोहसिन बागवान याने शनिवार (ता. १५) रोजी शहर पोलिस ठाण्यासमोरील रस्त्यावर विषारी औषध दिले.  

यावेळी त्याची प्रकृती गंभीर बनल्याने पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात केले. विषाचा शरीरावर घातक परिणाम झाल्याने मोहसिन मलिक  बागवान याचा आज रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची माहिती कळताच या परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी मटण मार्केटसह साजिदअली पठाण याच्या निवासस्थानी तसेच गुरुवार पेठ परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवला. दुपारी या प्रकरणातील संशयित म्हणून माजी नगरसेवक साजिदअली बरकतअली पठाण याला अटक करण्यात आली. त्याचा भाऊ बबलू अद्याप फरारी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com