शहर बंद ठेवायचे नाही असा ऐतहासीक व महत्वपूर्ण निर्णय

चंद्रकांत देवकते
गुरुवार, 18 जानेवारी 2018

मोहोळ - शहरातील बाजारपेठ वारंवार पुकारण्यात येणाऱ्या बंदमुळे उद्धस्त होत असून यापुढे शहर बंद ठेवायचे नाही असा ऐतहासीक व महत्वपूर्ण निर्णय सर्वपक्षीय नेते, सामाजिक संघटना, व्यापारी यांच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहाजहान शेख होते.

मोहोळ - शहरातील बाजारपेठ वारंवार पुकारण्यात येणाऱ्या बंदमुळे उद्धस्त होत असून यापुढे शहर बंद ठेवायचे नाही असा ऐतहासीक व महत्वपूर्ण निर्णय सर्वपक्षीय नेते, सामाजिक संघटना, व्यापारी यांच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहाजहान शेख होते.

राज्यात अथवा देशामध्ये विशिष्ठ विघातक प्रवृत्ती समाजातील जातीय व धार्मीक सलोखा बिघडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सोशल मिडीया किंवा अन्य प्रसार माध्यमाद्वारे अतिशय वेगाने या समाजविघातक गोष्टीचा प्रसार होत आहे . त्यातुन शहरामध्ये भडक माथ्याच्या तरुणाकडुन दुकाने बंद ठेवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. त्यातुन शहराची दंगेखोर व असुरक्षित शहर म्हणुन प्रतिमा बनू पाहत आहे. यासाठी सर्वपक्षीय जातीय व धार्मीक सलोखा अबाधित राहण्यासाठी यापुढे कोणत्याही  कारणासाठी मोहोळ शहर बंद ठेवायचे नाही असा निर्णय शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपा, कॉग्रेस, रिपब्लीकन पार्टी ( आठवले गट), मनसे, या प्रमुख राजकीय पक्षाबरोबरच  मराठा सेवा संघ, दलित स्वयंसेवक संघ, संभाजी बिग्रेड , भारतीय दलित महासंघ, छावा संघटना, भिम युवा प्रतिष्ठान, आदी संघटनांच्या  प्रमुख  नेत्यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला. 

या बैठकीस नगराध्यक्ष रमेश बारसकर, डॉ कौशिक गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत बोधे, काका देशमुख, दिपक गायकवाड, ब्रह्मदेव भोसले, नंदकुमार फाटे, शौकत तलफदार, संतोष गायकवाड, प्रविणसिंह गरड, बिलाल शेख, दादासाहेब पवार, महेश देशमुख, संजीव खिलारे, दिनेश घागरे, सतीश काळे, संजय क्षिरसागर, नागनाथ सोनवने ,पद्माकर देशमुख, प्रमोद डोके, युवराज सकट, प्रकाश चवरे, हेमंत गरड, अॅड. हिंदुराव देशमुख, अॅड हेमंत शिंदे, अॅड विनोद कांबळे, डॉ प्रमोद पाटील, किशोर पवार, दिनेश माने ,शाहु राजे देशमुख ,गौतम क्षिरसागर, बंटी आवारे, सत्यवान देशमुख, मुश्ताक शेख, अतुल गावडे, सुशील क्षिरसागर, संतोष खंदारे, संतोष सुरवसे , आण्णा फडतरे ,राहूल तावसकर, बाळासाहेब जाधव, दिनेश धोत्रे, अर्जुन क्षिरसागर, व्यापारी  चेतन शहा, दत्तात्रय  पुराणीक, भैय्या आंडगे, कांतीलाल भिवरे, बाहुबली कवठे, विनायक मोटे, अशोक बरकडे, आदीसह बहुसंख्य व्यापारी  उपस्थित होते.

Web Title: mohol news city not close decission