उत्तम कामगिरीबद्दल मोहोळ पोलिसांचा एसपींकडून सन्मान

राजकुमार शहा 
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

मोहोळ : गेल्या तीन महिन्यांपासून मोहोळ शहरासह तालुक्यातील अवैध दारू व्यवसाय, घरफोड्या, पाकीटमार, दुचाकीचोरी आदी गुन्ह्यातील आरोपींना गजाआड करून, त्यांच्याकडून सुमारे दहा लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. त्यांच्या या कामगिरीबद्दल मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यासह अन्य चार पोलिस कर्मचाऱ्यांचा जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी प्रशस्तीपत्रक व बक्षिस देऊन सन्मान केला.

मोहोळ शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात घरफोडया , आठवडे बाजारात पाकीट मारणे, घरासमोरुन मोटार सायकल चोरुन नेणे, अवैध दारू व्यवसाय या गुन्ह्यात वाढ झाली होती. पोलिस निरीक्षक कोकणे यांनी या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलिस नाईक शरद ढावरे, अभिजीत घाटे, विजय माने पोलिस कॉन्स्टेबल गणेश दळवी यांचे पथक नेमले व तपासासाठी सूचना दिल्या.

पथकाने उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली वरील प्रकारचे गुन्हे उघडकीस आणले व आरोपीना अटक केली. या कामगिरीची दखल घेऊन अधीक्षक पाटील यांनी या पथकाचा  प्रशस्तीपत्र व बक्षिस देऊन सन्मान केला. यामुळे इतर पोलिस कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढण्यास मदत झाली आहे.

Web Title: Mohol Police Honored by Superintendent of Police