Crime | 'पक्या मुळीक गॅंग'वर 'मोक्का' अंतर्गत इस्लामपूर पोलिसांची कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'पक्या मुळीक गॅंग'वर 'मोक्का' अंतर्गत इस्लामपूर पोलिसांची कारवाई
'पक्या मुळीक गॅंग'वर 'मोक्का' अंतर्गत इस्लामपूर पोलिसांची कारवाई

'पक्या मुळीक गॅंग'वर 'मोक्का' अंतर्गत इस्लामपूर पोलिसांची कारवाई

इस्लामपूर - शहरातील 'पक्या मुळीक गॅंग'वर 'मोक्का' अंतर्गत कारवाई करण्यात आली. इस्लामपूर पोलिसांची ही अलीकडच्या काळातील आठवी कारवाई आहे. पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी ही माहिती दिली.

कृष्णात पिंगळे म्हणाले, "इस्लामपूर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी पक्या मुळीक गॅंगमधील पंकज मुळीक, सुरज बाबर, अजित उर्फ राजकुमार दोडमनी, उमेश नाईक व ओमकार नाईक यांच्यावर कारवाई केली होती. या सहा जणांनी प्रथमेश कांबळे याला 'तू विक्रांत क्षीरसागर याच्याबरोबर का फिरतोस ल?' असे म्हणून कोकस हॉटेल येथे बोलावून घेत मोटरसायकलवरून बेघर वसाहत येथे नेऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी केली होती.

त्यानंतर प्रथमेश कांबळे याला मोटरसायकलवर बसवून पेठ गावच्या हद्दीत जुन्या बंद पडलेल्या व्यायामशाळेजवळ नेऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. सुरज बाबर याने तेथे पडलेला लोखंडी गज उचलून प्रथमेशला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. प्रथमेश खाली वाकल्याने तो लोखंडी गज फिर्यादीच्या पाठीत लागला होता.

हेही वाचा: ज्येष्ठ, लहान मुलं आणि गरोदर महिलांना मिळणार विठ्ठल मंदिरात प्रवेश

'पोलिसात तक्रार करशील तर तुला सोडणार नाही, तुझा कायमचा काटा काढू' अशी धमकीही दिली होती. 'पक्या मुळीक गॅंग' या टोळीविरुद्ध खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खुनी हल्ले, घरफोडी, सावकारी, अपहरण, गर्दी मारामारी, बेकायदेशीर जमाव जमवणे, शिवीगाळ व दमदाटी करणे असे एकूण ११ गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यातील सर्व आरोपींच्या विरोधात मोक्काअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांना पाठवला होता. त्याला ५ नोव्हेंबरला मंजुरी मिळाली. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, मनीषा दुबुले यांचे मार्गदर्शन मिळाले."

आतापर्यंत केलेल्या कारवाया

यापूर्वी इस्लामपूर पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये सुमारे ४५ जणांवर कारवाई झालेली आहे. यामध्ये अनमोल मदने (किसाननगर, इस्लामपूर) टोळीतील ४, कपिल कृष्णा पवार (इस्लामपूर) टोळीतील ३, सोन्या उर्फ सोनम बाळासाहेब शिंदे (मंत्री कॉलनी इस्लामपूर) टोळीतील ६, विशाल उर्फ मुक्या भीमराव पवार (बहादूरवाडी) टोळीतील ९, उदय रघुनाथ मोरे (आष्टा) टोळीतील ८ तर अजित हणमंत पाटील (इस्लामपूर) टोळीतील ७ जणांचा समावेश आहे.

loading image
go to top