विठ्ठल भक्तांसाठी गुड न्यूज! ज्येष्ठ, लहान मुलं आणि गरोदर महिलांना मिळणार विठ्ठल मंदिरात प्रवेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shri Vitthal Mandir

कार्तिकी यात्रेच्या तोंडावर राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याने ज्येष्ठ विठ्ठल भक्तांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

ज्येष्ठ, लहान मुलं आणि गरोदर महिलांना मिळणार विठ्ठल मंदिरात प्रवेश

sakal_logo
By
- भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर): कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिरातील काही नियम शिथील करण्यात आले आहेत. यामध्ये 65 वर्षावरील जेष्ठ व्यक्ती, लहान मुलं आणि गरोदर महिलांना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा: कार्तिकी एकादशीनिमित्त सजताहेत पंढरीतील बाजारपेठा

कार्तिकी यात्रेच्या तोंडावर राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याने ज्येष्ठ विठ्ठल भक्तांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. यासंदर्भात राज्य शासनाने राज्यभरातील सर्व धार्मिक स्थळं आणि मंदिरांबाबत हा आदेश पारित केला आहे. आदेशानुसार विठ्ठल रुक्मिणी मंदिरात या निर्णयाची आजपासून अंमलबजावणी सुरू करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.

हेही वाचा: आणि वारकरी आनंदले..! तब्बल वीस महिन्यांनंतर कार्तिकी यात्रा भरणार

कोरोना संसर्गामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये 65 वर्षावरील जेष्ठ व्यक्ती, लहान मुलं आणि गरोदर महिलांना बंदी करण्यात आली होती. त्यामुळे या व्यक्ती विठ्ठल दर्शनापासून वंचित होत्या. कार्तिकी यात्रेच्या तोंडावर राज्य शासनाने कोरोनाचे काही नियम आता शिथिल केले आहेत. त्यामुळे आता विठ्ठल मंदिरामध्ये सर्वांना प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे ज्येष्ठ विठ्ठल भक्तांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

loading image
go to top