घरात घुसून महिलेचा विनयभंग व मारहाण 

सुनील गर्जे 
बुधवार, 4 जुलै 2018

नेवासे : शेत वस्तीवर राहात असलेल्या एका विवाहित महिलेचा एकाने घरात घुसून केलेला विनयभंग करून या पिडीत महिलेला रस्त्यात अडवून जबर मारहाण करण्यात आली. हि घटना मंगळवार (ता. 3) रोजी चिलेखनवाडी (ता. नेवासे)  शिवारात घडली. याप्रकरणी नेवासे पोलिसांत चार महिलांसह एकूण आठ जणांविरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले आहे.

या प्रकरणी माहिती अशी, नेवासे तालुक्यातील नेवासे-शेवगाव मार्गावर असलेल्या चिलेखनवाडी शिवारातील मुक्ताई मंदिर परिसरात शेत वस्तीवर राहाणारी पिडीत महिला हि मंगळवारी घरी एकटीच असतांना तिचा येथीलच योगेश अण्णासाहेब सुरोसे (वय 27) याने घरात घुसून विनयभंग केला व त्या महिलेने विरोध केला असता तिला त्याने शिवीगाळ हि केली. 

दरम्यान झालेल्या प्रकरणी हि पिडीत महिला आपल्या पती समवेत तक्रार देण्यासाठी पोलिसांत जात असतांना या महिलेला रस्त्यात अडवून आप्पासाहेब एकनाथ मुरदरे, भीमाबाई अप्पासाहेब मुरदरे (दोघे राहणार भगूर ता. शेवगाव), योगेश अप्पासाहेब सुरोसे, सारिका योगेश सुरोशे, अण्णासाहेब आबाजी सुरोसे, आशाबाई अण्णासाहेब सुरोसे (सर्व राहणार चिलेखनवाडी, ता. नेवासे), हर्षदा कानिफ निकम, कानिफ निकम (दोघे राहणार मळेगाव, ता. शेवगाव) यांनी संगनमताने शिवीगाळ करत काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे, सहाय्यक फौजदार शैलेश ससाणे, संतोष फलके यांनी भेट दिली. 

याप्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादी वरून वरील चार महिलांसह एकूण आठ जणांविरोधात विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटने नंतर सर्व आरोपी फरार झाले आहे. 

Web Title: Molestation and assault of the woman in the house