विकलांग मुलीचा शिक्षकांकडून विनयभंग

अभय जोशी
मंगळवार, 2 एप्रिल 2019

पंढरपूर - येथील निवासी मूकबधिर विद्यालयातील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या कारणावरून शाळेतील चार शिक्षकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, त्यांना तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

पंढरपूर - येथील निवासी मूकबधिर विद्यालयातील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या कारणावरून शाळेतील चार शिक्षकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, त्यांना तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

येथील निर्भया पथकाचे पोलिस उपनिरीक्षक गजानन गजभारे यांनी त्यांच्या पथकातील महिला कॉन्स्टेबल सह मूकबधिर विद्यालयात जाऊन तेथील मुलींची भेट घेतली. त्यावेळी मुलींना गूड टच व बॅड टच याबाबत देखील माहिती दिली आणि बॅड टचचे काही अनुभव आहेत का अशी विचारणा केली. तेव्हा शाळेत शिकवणारे 4 शिक्षकच त्यांना बॅड टच करत असल्याचे समोर आले. नक्की काय झाले असावे हे समजावे यासाठी दुसऱ्या दिवशी पोलिसांनी सोलापूर येथील मूकबधिर विद्यालयातील शिक्षिका क्षितिजा गाताडे तसेच मोहोळ येथील महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती मरे यांना बोलावून घेतले. गाताडे यांनी त्यांच्या भाषेतून मूकबधिर मुलींची संवाद साधला. त्यावेळी शाळा शाळेतील शिक्षक ज्ञानोबा मल्हारी मस्के, अर्जुन तुकाराम सातपुते, संतोष बाळासाहेब कुलाल आणि सिद्धेश्वर शंकर वाघमोडे यांनी ऑक्टोबर 2018 पासून वेळोवेळी शारीरिक विकलांगतेचा गैरफायदा घेऊन नको त्या ठिकाणी टच करणे, वाईट नजरेने पाहणे असे लैंगिक छळाचे प्रकार केल्याचे त्यांच्या प्रश्नोत्तराच्या जबाबात स्पष्ट झाले.

पीडित मुलींच्या वतीने निर्भया पथकातील महिला पोलिस श्रीमती मनेर यांनी याप्रकरणी चार शिक्षकांच्या विरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून या प्रकरणी उपनिरीक्षक गजभारे पुढील तपास करत आहेत.

उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गजभारे पोलीस कॉन्स्टेबल भोसले शिंदे मनेर पुढे ताकमोगे यांनी हा अत्याचाराचा प्रकार उघडकीस आणला आहे.

Web Title: Molestation of disabled girl by her teachers