गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोहोळ पोलिसांनी केले 37 जणांना हद्दपार

चंद्रकांत देवकते
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

मोहोळ : मोहोळ पोलिसांकडून गणेशोत्सव उत्सवाच्या मिरवणुकीत गांवात अवैध दारू विक्री करणाऱ्या लोकांची माहिती एकत्रित करून उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रकांत खांडवी सोलापूर ग्रामीण विभाग यांच्याकडे रेकाॅर्डवरील गुन्हेगार शोधून यांना गावातून तडीपार करण्याचे फौजदारी प्रकिया संहिता १९७३ अधिनियमचे कलम १४४ (३) अन्वये प्रस्ताव सादर केले होते. त्यावरून चंद्रकांत खांडवी यांनी गणेशोत्सव कालावधीत अवैध दारूची विक्री होऊ नये, याकरीता २१ सप्टेबर ते २३ सप्टेबर असे एकूण तीन दिवसांसाठी एकूण ३६  लोकांना गावातुन तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत. 

त्यामध्ये त्यांच्या गावात अवैध दारू विक्री करणारे 1) लालचंद व्यकंट शिंदे रा.पोखरापुर 2) नवनाथ कुंडलीक मते रा.चिखली 3) दत्तात्रय भागवत उंबरे रा.अनगर 4) गणेश भागवत गुंड रा.अनगर 5) सर्जेराव शंकर पडवळकर रा.अेोंढी 6)महादेव रामचंद्र बचुटे रा.अेोंढी 7) तुकाराम त्रिंबक वाघमोडे रा.अेोंढी 8) भोलेनाथ उर्फ बापु दत्तात्रय वसेकर रा.टाकळी 9) सचिन विलास पवार रा.अंकोली 10) सुरेश सर्जेराव गायकवाड रा.ढोकबाभुळगाव 11) राजु कृष्णा तुपसंमिदार रा.गोटेवाडी 12) नागनाथ बाळु टिंगरे रा.शिरापुर 13) सिकंदर अशोक शिंदे रा.मोरवंची 14) अज्ञान मच्छिंद्र माने रा.वडवळ 15) संतोष महादेव कोळी रा.पापरी 16) भास्कर लिबाजी खुर्द रा.येवती 17) मोहन नामदेव कोळी रा.पापरी 18) सतीश दत्तात्रय देवकते रा.अर्जुनसोंड 19) धनाजी शिवराम ढेरे रा.अर्जुनसोंड 20) शिवराम विठ्ठल ढेरे रा.अर्जुनसोंड 21) तानाजी गोपिनाथ जगताप रा.खंडाळी 22) संतोष कुंडलीक चव्हाण रा.टाकळी 23) विलास गेापाळ गायकवाड रा.अंकोली 24) भारत गोवर्धन शिंगाडे रा.कोन्हेरी 25) राजु धोंडीबा चवरे रा.पेनुर 26) महंमद रहीमान मुजावर रा.पेनुर 27) मारूती बजरंग चवरे रा.पेनुर 28) अनिल महादेव चव्हाण रा.मोहोळ 29) रफीक हुसेन शेख रा.दत्तनगर मोहोळ 30) बाळु धुळाप्पा सरक रा.मोहोळ 31) महेश बजंरग पवार रा.मोहोळ 32) बापु दत्तु शिरसट रा.मोहोळ 33) प्रदीप पंडीत नरूटे रा.लांबोटी 34) किशोर बाबुराव सलगर रा.लांबोटी 35) दत्तात्रय बळीराम शिंदे उर्फ पाटील रा.लांबोटी 36) ज्ञानेश्वर सुभाष व्यवहारे रा.लांबोटी 37) लखन जगदीश कोळी रा.मोहोळ  वरील 37 गावातील हद्दपार लेाक हे गावात पुन्हा आल्यास त्यांच्या तपासणीसाठी पोलिस पथके नेमण्यात आली असून वरील लोक गावात मिळून आल्यास पुन्हा त्यांचे भारतीय दंड संहिता कलम 188 प्रमाणे कारवाई करण्यात येईल. तसेच वरील लोक हे ताडीपार केलेल्या गावाच्या हद्दीत दिसल्यास नागरिकांनी मोहोळ पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे अावाहन पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यानी केले आहे

सोलापुर जिल्ह्यातील मोहोळ पोलिस ठाण्याकडून प्रथमच मोठया प्रमाणात गणेशोत्सव काळात प्रतिबंधक कारवाई केली आहे. सदर कारवाईसाठी पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते, उपविभागीय सोलापूर ग्रामीण अधिकारी चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे, मोहोळ पोलिस ठाणे यांनी कारवाई केली.

Web Title: Moloh police taken action against 37 peoples