आई... कुठ कुठ शोधू मी तुला?

corona
corona
Updated on

नागठाणे (जि. सातारा) : कोरोनाच्या संकटाने कित्येक शोकांतिका जन्माला घातल्या. एका क्षणात होत्याचे नव्हते केले. कित्येकांच्या वाट्याला शेकडो मैलांची पायपीट आली. जनावरेही या तडाख्यातून सुटली नाही. त्यातून महामार्गावरील भरतगाव (ता. सातारा) येथे रस्त्याकडेला सोडलेले अन्‌ आईविना पोरके झालेले वासरू सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. 

कोरोनाजन्य परिस्थितीमुळे समाजमनाला हादरा देणाऱ्या, हालवून सोडणाऱ्या कित्येक घटना रोज वृत्तपत्रांत वाचावयास मिळत आहेत. "सोशल मीडिया'तून जनमाणसांपर्यंत पोचत आहेत. महामार्गावरलगतच्या गावांतील लोकांना तर त्याचा प्रत्यय पदोपदी येताना दिसतो. आजदेखील उन्हाची, अवकाळी पावसाची पर्वा करताना कित्येक कामगार आपापल्या गावाची वाट पायी तुडवत जाताना दिसतात. त्यापलीकडे जात महामार्गावरील भरतगाव येथे आपल्या आईविना दिसणारे एक वासरू एकाकी अवस्थेत सापडले आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून महामार्गाच्या सेवारस्त्यालगत हे वासरू दिसत आहे. आपल्यासोबत घेऊन जाणे शक्‍य नसल्यामुळे एक ते दीड महिन्याचे हे नवजात वासरू मध्येच वाटेत सोडून दिले असण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. परिसरातील काही युवकांनी या वासरापुढे चारा आणून टाकलेला आहे. प्लॅस्टिकच्या बाटल्यांतून पाण्याची सोय केली आहे. सकाळी, संध्याकाळी सेवारस्त्यावरून फिरायला जाणारे परिसरातील लोक या वासराजवळ थांबतात. हंबरणारे वासरू पाहून हळहळ व्यक्त करतात. 

प्राणिप्रेमींना आवाहन... 
आई हरवलेल्या या वासराच्या मदतीसाठी प्राणिप्रेमी वा प्राणीजीव संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुढे येण्याची अपेक्षा स्थानिक ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. सध्या परिसरात वळिवाचा पाऊस मुसळधारपणे कोसळत आहे. त्यात निवाऱ्याअभावी या वासराचे मोठे हाल होत असल्याचे दुर्दैवी चित्र पाहावयास मिळत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sakshi Pawar death after Renavi Ghat accident
Chandrakant Patil Announces Gazette Notification for Jat Taluka
Shirala Nag Panchami 2026
Sangli Miraj Urban Expansion and Drainage Crisis
Marathi News Esakal
www.esakal.com