वानराला जेरबंद करण्यासाठी सोलापुरात 'सर्जिकल स्ट्राईक' 

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

दोन दिवस होणार उपचार 
या वानरास पकडताना त्याच्या अंगावर डॉट गंनद्वारे भुलीच्या इंजेक्‍शनचा दोन ते तीन वेळा मारा करण्यात आला. त्यामळे त्याला खरचटले आहे. त्याच्यावर दोन दिवस प्राणिसंग्रहालयात उपचार करण्यात येऊन नंतर त्यास जंगलात सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

सोलापूर : भटकत आलेल्या वानराला पकडण्यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्यांना कसल्याच प्रकारची दाद न देणाऱ्या वानराला जेरबंद करण्यासाठी अखेर "सर्जिकल स्ट्राईक'चा वापर करावा लागला. "डॉट गन'च्या मदतीने त्याला बेधुंद केल्यावर वानरला जाळ्यात पकडण्यात यश आले. चित्रपटाती घटना शोभावी असा हा लपाछपीचा खेळ रंगला  महापालिका  कौन्सिल हॉलच्या समोरील परिसरात.
 
कौन्सिल हॉलसमोरील बागेत सकाळी एक भटके वानर दिसले. या वानराने अक्षरशा या परिसरात उच्छाद मांडला होता. गंमत म्हणून काहीजणांनी त्याची चेष्टा सुरू केली. काहींनी त्याला खाऊ देण्याचा प्रयत्न केला. काही कर्मचाऱ्यांनी सफाई अधीक्षक संजय जोगदनकर यांना ही घटना सांगितली. त्यांनी लगेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शुभांगी ताजणे यांना माहिती दिली. त्या वनविभागाच्या पथकासह पालिकेत दाखल झाल्या. डॉटगन मध्ये भूलीचे इंजेक्‍शन टाकून वानरावर तीन ते चार वेळा निशाणा साधला. गुंगीच्या इंजेक्‍शनचे डोस अंगाला लागल्याने ते वानर गुंगीमुळे शांत झाले. 

जाळे घेऊन पाठलाग करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याने गुंगारा दिला. कौन्सिल हॉल समोरील बागेतून कंपाऊंड वॉलवरून लगतच्या एलआयसी कार्यालयाच्या बिल्डिंगमध्ये उडी घेत त्या वानराने पळून जाण्याचाही प्रयत्न केला. मात्र त्याला शिताफीने जाळ्यात ओढण्यात दोन्ही पथकाने यश मिळविले. या मोहिमेत डॉ. ताजणे यांच्यासह वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी निकेतन जाधव, कृष्णा नीरवले, भरत शिंदे, संतोष पापळ, लक्ष्मण बंडगर आणि त्यांचे सहकारी सहभागी झाले होते. 

दोन दिवस होणार उपचार 
या वानरास पकडताना त्याच्या अंगावर डॉट गंनद्वारे भुलीच्या इंजेक्‍शनचा दोन ते तीन वेळा मारा करण्यात आला. त्यामळे त्याला खरचटले आहे. त्याच्यावर दोन दिवस प्राणिसंग्रहालयात उपचार करण्यात येऊन नंतर त्यास जंगलात सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: monkey traped in Solapur