Ethanol Petrol Issues : पावसाळ्यात तुमचीही दुचाकी अचानक बंद पडतेय? पेट्रोलमधील 'या' गोष्टीमुळे वाढली वाहनचालकांची डोकेदुखी; कशी घ्यावी खबरदारी?

Why Bikes Break Down More Frequently During Monsoon : पावसाळ्यात इथेनॉलयुक्त पेट्रोलमध्ये पाणी मिसळल्याने स्पार्क प्लग निकामी होणे, इंजिन मिसफायर आणि दुचाकी अचानक बंद पडण्याच्या घटना वाढल्या आहेत.
ethanol petrol causing bike engine problems

ethanol petrol causing bike engine problems

esakal

Updated on

कुंडल : पावसाळ्याची सुरुवात होताच दुचाकी वाहने अचानक बंद पडण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. पेट्रोलमधील इथेनॉलचे वाढलेले प्रमाण आणि पावसाळी वातावरणातील दमटपणा यामुळे हा तांत्रिक बिघाड होत असल्याचे वाहन दुरुस्ती व्यावसायिकांचे निरीक्षण (bike breakdown due to rain and ethanol fuel) आहे. भर पावसात किंवा रात्रीच्या वेळी स्पार्क प्लग निकामी होऊन वाहने रस्त्यातच बंद पडत असल्याने विशेषतः विद्यार्थी आणि नोकरी करणाऱ्या महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com