Chandoli Tourism : पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' तारखेपासून चांदोली धरण पर्यटनासाठी राहणार बंद, काय आहे कारण?

चांदोली धरणात (Chandoli Dam) सध्या ३०.१६ टक्के, म्हणजेच १०.३८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.
Chandoli National Park
Chandoli National ParkSakal
Summary

यंदा मॉन्सूनने (Monsoon) ८ जूनलाच चांदोली परिसरात दमदार हजेरी लावली आहे.

वारणावती : पावसाला सुरुवात झाल्यानंतर अपघात, अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी चांदोली धरण पर्यटकांसाठी (Tourists) बंद करण्यात येते. यंदा मॉन्सूनने (Monsoon) ८ जूनलाच चांदोली परिसरात दमदार हजेरी लावल्याने आजपासून (ता. ११) चांदोली धरण पर्यटकांसाठी बंद करण्यात येणार असल्याची माहिती धरण प्रशासनाकडून देण्यात आली.

पर्यटकांनी नोंद घेण्याचे आवाहन धरण प्रशासनाकडून करण्यात आले. चांदोली धरणात (Chandoli Dam) सध्या ३०.१६ टक्के, म्हणजेच १०.३८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. उपलब्ध पाणीसाठ्यापैकी ३.५० टीएमसी उपयुक्त आहे.

Chandoli National Park
'या' सर्वात जुन्या धरणासाठी म्हैसूरच्या महाराजांनी राजेशाही दागिने ठेवले होते 'गहाण'; काय आहे धरणाची खासियत?
Chandoli Dam
Chandoli Dam

आणखी किमान एक महिना पुरेल इतका पाणीसाठा धरणात उपलब्ध असल्याने पाऊस काही काळ लांबला तरी पाणी टंचाई भासणार नसल्याची स्थिती आहे. चांदोली परिसरात आज दुपारनंतर रिमझिम सुरूच आहे. पेरणी केलेल्या भात पिकाला पोषक असाच पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com