मोहोळ परिसरात पावसामुळे पिकांना जीवदान

राजकुमार शहा
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

गेल्या दोन महिन्यापासुन पावसाने दडी मारल्याने जमीनीत उभी असलेली पिके माना टाकु लागली होती, तर विहीरी व बोअर यांच्या पाणी पातळीत घट झाली आहे. त्यामुळे ऊस जगविणे अवघड झाले होते. परिणामी ऊसाची वाढ खुंटली आहे. बुधवारी रात्री पासूनच आश्लेषा नक्षत्राच्या संततधार पावसाला सुरवात झाली.

मोहोळ  : गेल्या दोन माहिन्यापासुन विश्रांती घेतलेल्या पावसाने मोहोळ तालुक्यात सर्वदुर हजेरी लावली असुन या पावसामुळे खरीपातील तुर सोयाबीन या सह ऊस भुईमुग मका कांदा या पिकांना तर द्राक्ष डाळींब बोर सिताफळ केळी या फळबागांना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे असे जरी असले तरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नजरा उजनी धरणाकडे लागल्या आहेत.

गेल्या दोन महिन्यापासुन पावसाने दडी मारल्याने जमीनीत उभी असलेली पिके माना टाकु लागली होती, तर विहीरी व बोअर यांच्या पाणी पातळीत घट झाली आहे. त्यामुळे ऊस जगविणे अवघड झाले होते. परिणामी ऊसाची वाढ खुंटली आहे. बुधवारी रात्री पासूनच आश्लेषा नक्षत्राच्या संततधार पावसाला सुरवात झाली. रात्रभर भिज पाऊस सुरू असल्याने जमिनीतील ओल खोलवर जाण्यास मदत झाली आहे. रात्रभर भिज पाऊस झाला असला तरी जमिनीत पाणी साठल्याचे दिसत नाही.

मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांची भिस्त उजनी धरणावर आहे. उजनीच्या वरची धरणे भरल्याने व पुणे परिसरात पाऊस सुरू असल्याने उजनीत पाणी साठा वाढत आहे. अनेक शेतकऱ्यांनी ऊस लागवडीसाठी जमिनीची मशागत करून सरी घालुन तोडुन ठेवली आहे. मात्र उजनीतील पाण्याची पातळी वाढण्याकडे सर्व शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. पाणीसाठा साठ ते सतर टक्के झाला, तर मात्र ऊस लागवडीस वेग येणार आहे. सध्या कालव्याला पाणी सुरू आहे. परंतु पुन्हा पाऊस लांबला तर काय करावयाचे या भितीपोटी ऊस लागवडी खोळंबल्या आहेत शेतकऱ्यांना अद्यापही दमदार पावसाची अपेक्षा आहे.

Web Title: monsoon rain in Mohol