तासगाव बाजार समितीत सहा टक्‍के दराने बेदाणा तारण कर्ज 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

तासगाव - तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांसाठी बेदाणा तारण कर्ज योजना सुरू केली असून, पणन महामंडळाकडून त्यासाठी दोन कोटी रुपये उपलब्ध झाले असून 6 टक्‍क्‍यांनी कर्ज उपलबध होणार असल्याची माहिती तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अविनाशकाका पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. याशिवाय शेतक-यांच्या बेदाण्याला सौद्यामध्ये न्याय मिळावा, यासाठी सौद्याच्या पद्धतीत बदल केला असल्याचेही त्यांनी सांगितले. 

मागील तीन बेदाणा हंगामात तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने कृषी व पणन महामंडळाच्या माध्यमातून 6 टक्‍के दराने बेदाणा तारण कर्ज योजना उत्कृष्ट पद्धतीने राबविली असून, शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड वेळेत केल्याने पणन मंडळाने 2 टक्‍के रिबेट म्हणून प्रोत्साहन अनुदान दिले होते, बाजार समितीने ते प्रोत्साहन अनुदान शेतक-यांना दिल्याने शेतक-यांना अवघ्या 4 टक्‍के दराने बेदाणा तारण कर्ज उपलब्ध झाले होते. यावर्षीही बाजार समितीने बेदाणा तारण कर्ज योजना सुरू केली असून, सुरवातीला बाजार समिती यासाठी 1.5 कोटी रुपये स्वतःच्या निधीतून उपलब्ध करून देणार आहे. बाजार समितीने पणन मंडळाने 10 कोटींची मागणी केली असून पणन मंडळाने 2 कोटी रुपये मंजूर केले आहेत. उर्वरित रक्‍कम मंजूर होण्यासाठी बाजार समितीने पणन राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला असून सकारात्मक चर्चा झाली आहे. ज्या बेदाणा उत्पादक शेतक-यांना या योजनेत सहभागी व्हायचे आहे, त्यांनी बाजार समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन सभापती पाटील यांनी केले आहे. 

सौद्यासाठी एकावेळी फक्त 50 कलमांचा निर्णय 
बाजार आवारात बेदाणा आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे, बेदाणा आवक वाढलेली आणि अडत व्यापाऱ्यांना दिलेली वेळ कमी असा प्रकार सुरू आहे, त्यामुळे दिलेल्या वेळेत जास्तीत जास्त बेदाणा सौदे काढण्याचा प्रयत्न व्यापारी करतात. अवघ्या 4 ते 7 सेकंदात एका कलमाचा सौदा होत असल्याचे बाजार समितीच्या संचालक मंडळाने पहाणी केली असता निदर्शनास आले आहे. वर्षभर कष्ट करून पिकविलेला बेदाणा सौद्यात 4 ते 7 सेकंदात विकला जाणे, ही गंभीर बाब आहे. त्या पार्श्‍वभूमीवर एका दुकानात एका वेळी 50 कलमे सौद्यासाठी काढावीत, असा निर्णय बाजार समितीने घेतला असल्याचीही माहिती अविनाश पाटील यांनी दिली. 

Web Title: Mortgage loan at the rate of six per cent of the currant market committee Tasgaon