आत्ताचा काळ हा टेक्‍नोस्लेव्ही - डॉ. दवणे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

सोलापूर - "तंत्रज्ञानाचा बडेजाव वाढला आहे. यामुळे माणूस टक्‍नोसॅव्ही होण्याऐवजी टेक्‍नोस्लेव्ही (तंत्रज्ञानाचा गुलाम) झाला आहे. यातून सुटका करून सांस्कृतिक पर्यावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे.' असे ज्येष्ठ साहित्यिक व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार प्रवीण दवणे यांनी वार्तालापमध्ये सांगितले. 

श्री. दवणे म्हणाले, "तंत्रज्ञानाचा वापर वाढत असताना ई-बुक्‍स वाचण्याकडे कल वाढायला हवा होता. मात्र असे दिसत नाही. पुस्तके वाचल्यामुळे माणसाच्या विचारावर सकारात्मक परिणाम घडतो. नाती मजबूत बनतात, मात्र तंत्रज्ञानाच्या वापराने नाती तुटण्याची शक्‍यता वाढली आहे. घरात सर्व सुखसोयी असतानापण पुस्तकाचे कपाट दिसत नाही. यासाठी लेखक व पत्रकारांनी जागे होणे गरजेचे आहे. असे न झाल्यास भारतातील वाचन परंपरा निसटण्याची शक्‍यता आहे.' 
 
"लेखक नाही तर लेखक कार्यकर्ता आहे. तरुण मूल खूप चांगल्या प्रकारचे लेखन करतात. एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्यासाठी मला काम करायचे आहे. तरुण लेखकांना मार्गदर्शन मिळाल्यास ते आणखी चांगले लिहू शकतात. असे काम करण्यासाठी मी निवडणुकीमध्ये उभा आहे. फक्त एका दिवसाचा टिळा लावून साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होण्यापेक्षा सतत काम करण्यावर माझा भर असणार आहे. प्रत्येक दोन-तीन महिन्यानंतर माझ्या कामाचे अवलोकन करणार. साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष झाल्यानंतर वर्षभर नव्हे, तर पुढेही काम करत राहीन. माझ्यामागे कोणतीही संस्था, संघटना नाही माझी पुस्तके, वाचक व मित्र यांच्या सहकार्यामुळेच मी अध्यक्षपदासाठी उभा आहे.'

Web Title: Most recent date techno savvy