आई व भावाचा निर्घृण खून 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

मलकापूर - घर विकण्यावरून कुटुंबात झालेल्या वादातून मोठ्या भावाने आपला लहान भाऊ आणि आईचा निर्दयीपणे खून केल्याची धक्कादायक घटना आगाशिवनगर (ता. कऱ्हाड) येथील आझाद कॉलनीत आज पहाटे सहाच्या सुमारास घडली. घराच्या अंगणात आई व लहान भावावर गुप्तीचे सपासप वीसपेक्षा जास्त वार त्याने केले. दोघे मृतावस्थेत पडले असतानाही पुन्हा त्यांच्या डोक्‍यात रॉड मारून त्याने अमानुषपणाचा कळस गाठला. पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. 

पोलिसांनी सांगितले, की जयश्री गजानन घोडके (वय 63) व राजेश गजानन घोडके (40) अशी मृतांची नावे आहेत. राकेश गजानन घोडके (वय 43) असे संशयिताचे नाव आहे. संबंधित कुटुंब नायब तहसीलदार (कै.) गजानन घोडके यांचे आहे. गजानन घोडके यांचे दोन वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. त्यानंतर त्यांच्या प्रापर्टीवरून वाद होता. 

खून झालेले राजेश घोडके इस्लामपूर येथील भूमी अभिलेख कार्यालयात नोकरीस होते. सध्या त्यांची फलटण येथे बदली झाली होती. ते नोकरीसाठी आज सकाळी सहा वाजता आवरून निघाले होते. त्या वेळी राजेश बाहेर येण्याची अंगणात वाट पाहात बसलेला त्याचा मोठा भाऊ राकेशने थेट त्यांच्या डोक्‍यात गुप्तीने सपासप वार केले. बाहेर काय झाले ते बघण्यास अंगणात आलेल्या आईवरही त्याने सपासप वार केले. दोघांवर किमान दहा मिनिटे राकेश वार करत होता. दोघेही काही क्षणातच रक्ताच्या थारोळ्यात कोसळून जागीच ठार झाले. त्यानंतरही त्याने पुन्हा त्यांच्या डोक्‍यात रॉडने वार केला. दोघेही मृत झाल्याची खात्री पटल्यानंतर तो तसाच एका कोपऱ्यात बसून राहिला. 

लोकांनी पोलिसांना कळविल्यावर हवालदार सतीश जाधव यांनी धाडसाने राकेशच्या हातातील गुप्ती काढून घेतली. त्याला ताब्यात घेतले. या हत्याकांडाने मलाकापूर, कऱ्हाडला खळबळ उडाली आहे. राजेशने घर विकण्यास विरोध केल्याने त्याचा खून केल्याची कबुली राकेशने दिली आहे. घोडके कुटुंब मूळचे साळशिरंबे येथील आहे. येथील आझाद कॉलनीत अनेक वर्षांपासून ते राहतात. वडिलांच्या निधनानंतर येथील घर विकण्याचा राकेशचा तगादा होता. त्यावरून वारंवार दोन्ही भावांत खटके उडत होते. 

पत्नीवरही केला वार 
राकेश आई जयश्री व भाऊ राजेशवर वार करत होता. त्या वेळी त्याची पत्नी तेथे आली. तिने राकेशला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र राकेशने तिलाही गजाने मारले. पती ऐकत नाही, हे पाहून थेट पोलिसांत येऊन तिने घटनेची माहिती दिली.

Web Title: Mother and brother murder in malkapur