तलावामध्ये बुडून आई व मुलीचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

कर्जत, (जि. नगर) - गुरवपिंप्री (ता. कर्जत) येथे तलावात खोदलेल्या विहिरीत बुडून गुरुवारी सकाळी मीराबाई अनिल थोरात (वय 38) व त्यांची मुलगी ज्ञानेश्‍वरी थोरात (वय 14) या मृत्युमुखी पडल्या. ओंकार अनिल थोरात (वय 13) या त्यांच्या छोट्या मुलाला वाचविण्यात गावकऱ्यांना यश आले.

मीराबाई थोरात, ज्ञानेश्‍वरी व ओंकार आज सकाळी दहाच्या सुमारास गाय धुण्यासाठी गावातील बोंदर्डी तलावावर गेले. मीराबाई गाय धूत होत्या. ज्ञानेश्‍वरी खेळता खेळता पुढे गेली. तलावात असलेल्या विहिरीचा अंदाज न आल्याने ती बुडाली. तिला वाचविण्यासाठी मीराबाई गेल्या. पुढे सरकण्याचा प्रयत्न करणाऱ्या मीराबाईंना ज्ञानेश्‍वरीने घट्ट मिठी मारली.

दोघींनाही पोहता येत नव्हते. त्या बुडत असल्याचे पाहून ओंकारही पाण्यात उतरला. "पुढे येऊ नको' असे त्याला सांगतच मीराबाई बुडाल्या. आरडाओरड ऐकून आजूबाजूचे लोक तेथे जमले. त्यातील काहींनी ओंकारला वाचविले. मीराबाई व ज्ञानेश्‍वरी यांचा मात्र मृत्यू झाला. तलावात विहीर खोदण्यास कुणी परवानगी दिली, याची चौकशी करून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. राजेंद्र मुरलीधर थोरात यांनी पोलिस ठाण्यात माहिती दिली.

Web Title: mother & daughter drawn in lake