भिंतीवर डोके आपटून मुलाकडून आईचा खून

भिंतीवर डोके आपटून मुलाकडून आईचा खून

वाई - रागाच्या भरात १०५ वर्षे वयाच्या वृद्ध आईचा मुलानेच भिंतीवर डोके आपटून खून केला. काल (ता. २०) रात्री साडेआठच्या सुमारास आकोशी (ता. वाई) येथे ही घटना घडली. या प्रकरणातील विठ्ठल धोंडीबा भणगे (वय ५० वर्षे, रा. गणेशवाडी) याला पोलिसांनी अटक केली असून, त्यास पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. श्रीमती सोनाबाई धोंडीबा भणगे असे मृत वृद्ध महिलेचे नाव आहे. 

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, काल रात्री आठ दरम्यान विठ्ठल भणगे याने  रामचंद्र धोंडीबा भणगे यांच्या मालकीच्या दत्त मंदिरातील मूर्तींची मोडतोड करून विंटबना केली. त्यानंतर जाब विचारण्यासाठी ग्रामस्थ त्याच्या घरी गेले. त्या वेळी सोनाबाई भणगे यांच्या डोक्‍यातून व कानातून रक्त वाहत होते आणि त्या निपचित पडल्या होत्या. ‘आई माझ्याशी लई भांडत होती म्हणून तिचे डोके भिंतीवर आपटून तिला कायमची संपविली,’ असे विठ्ठलने सांगितले. त्यानंतर पोलिस पाटील कृष्णदेव रामचंद्र भणगे यांनी वाई पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी विठ्ठलला अटक करून न्यायालयात हजर केले. या घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक बबन येडगे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com