तासगाव तालुक्यात 3 मुलींसह आईची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

या घटनेची माहिती मिळताच सांगलीतून बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. विहिरीतून दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, अन्य मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. 

तासगाव ः  तासगाव तालुक्यातील वज्रचौडे गावात आपल्या तीन मुलीसह आईने विहरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वज्रचौडे गावात आज (सोमवार) सकाळी ही घटना उघडकीस आली. या महिलेने आपल्या तीन मुलींसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. कौटुंबिक वादातून ही आत्महत्या केल्याचा पोलिसाचा अंदाज आहे.

या घटनेची माहिती मिळताच सांगलीतून बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. विहिरीतून दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, अन्य मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. 

Web Title: mother suicide with three childrens in Tasgaon