Mother's Day : आईचे दर्शन घेऊनच होते चंद्रकांत पाटील यांची कामांना सुरुवात

Mother's Day : आईचे दर्शन घेऊनच होते चंद्रकांत पाटील यांची कामांना सुरुवात

दौरा कुठलाही असो, घरातून निघताना आणि घरात परत आल्यानंतर पहिल्यांदा आई सरस्वती यांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेणे; मग बाकीच्या कामास सुरवात. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा हा नित्यक्रमच झाला आहे. आई म्हणजे देवाचे दुसरे स्वरूप. स्नेह, प्रेम, करूणा, दया, वात्सल्य याचे रूप म्हणजे आई सरस्वती असल्याची पालकमंत्री श्री. पाटील यांची भावना आहे. आपल्या कृतीतून ते आपल्या या भावना व्यक्तही करतात. आज ‘जागतिक मदर्स डे’ साजरा होत आहे.

वास्तविक, भारतीय संस्कृतीत रोजचा दिवस हा मातृ दिवस असल्याचे पालकमंत्री श्री. पाटील मानतात आणि त्या पद्धतीनेच आपली मूल्ये त्यांनी जपली आहेत. आई सरस्वती यांनी त्यांच्यावर केलेल्या संस्कारामुळेच आज श्री. पाटील राज्याच्या मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती सांभाळत आहेत. श्री. पाटील यांचे वडील गिरणी कामगार. घरची परिस्थिती बेताचीच; पण आई सरस्वती यांनी संस्काराचे बीजारोपण त्यांच्यावर केले. त्यातूनच मगच देशसेवेसाठी श्री. पाटील कार्यरत झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अभाविपच्या माध्यमातून त्यांनी मोठे काम उभे केले. त्या पाठीमागे त्या संघटनेबरोबच आईचे संस्कार होतेच. 

श्री. पाटील व त्यांची आई सरस्वती यांचे नाते आजच्या युगात आदर्शवत असेच आहे. आईमुळेच जीवन साफल्य झाल्याची भावना श्री. पाटील यांच्या कृतीतून व्यक्त होत असते. मंत्री झाल्यानंतर सगळीकडे फिरणे सुरू असले तरी घरी आले की, पहिल्यांदा आईचा आशीर्वाद घेणे आणि दौऱ्यावर जाताना किती दिवस जाणार, कधी येणार हे सांगून आशीर्वाद घेऊनच बाहेर पडतात. मुलगा चंद्रकांतची लहानपणाची पोटाची खळगी भरण्यासाठी झालेली धावपळ, त्यांनी शिक्षणासाठी घेतलेले कष्ट, अगदी चाळीतील घरापासून ते आता बंगल्यापर्यंतचा त्यांचा कष्टमय प्रवास, तसेच चंद्रकांत समाजातील नाही रे गटापासून ते दारात कोणीही मदतीसाठी आल्यानंतर करत असलेली मदत पाहून आई सरस्वतींच्या डोळ्यांच्या कडा ओलावतात.

आपल्याला मिळाले नाही, ते मिळवून समाजासाठी खूप मोठे काम चंद्रकांत करत असल्याचे त्या आवर्जून सांगतात. माझ्याप्रमाणेच उपेक्षित समाज देखील चंद्रकांतसाठी आईप्रमाणेच असल्याचे त्या सांगातात. तर दुसरीकडे श्री. पाटील यांच्या मते आई म्हणजे देवाची सर्वश्रेष्ठ कृती आहे. आईच्या कुशीत जगातील सर्वांत जास्त सुरक्षित जागा आहे. आईची ममता आणि प्रेम दुसऱ्या कशातच नाही. जे काही आहे ते आईमुळे आहे. तिचे योगदान अधिक आहे. तिचे संस्कार आदर्श आहेत. आईमुळेच नेहमी ऊर्जा मिळते. प्रेरणा मिळते. म्हणून ते म्हणतात प्रेमस्वरूप आई...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com