बॅंकेसमोरील रांगेत घुसली मोटार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 डिसेंबर 2016

सोलापूर - पैसे काढण्यासाठी बॅंकेसमोर रांगेत थांबलेल्या वीसपेक्षा अधिक जणांना मोटारीने उडविले. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास विजापूर रस्त्यावरील कोटणीसनगर येथील बॅंक ऑफ इंडियासमोर घडली. यापूर्वी कधीच मोटार न चालविलेल्या मद्यधुंद चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा थरार घडला.

पैसे काढण्यासाठी आणि भरण्यासाठी बॅंक ऑफ इंडियासमोर लांबपर्यंत रांग लागली होती. बॅंकेसमोरच परिवहन समितीचे माजी सभापती सुभाष चव्हाण यांचे घर आहे. त्या घरातून एक मोटार (क्र. एमएच 13 एसी 663) बाहेर आली. काही कळायच्या आत ती वेगाने बॅंकेसमोरील गर्दीत घुसली. वीसपेक्षा अधिकजणांना मोटारीने उडविले. रस्त्यावरून जाणारा भाजीविक्रेता आणि इतरही लोकही जखमी झाले. काही अंतरावर पुढे जाऊन ही गाडी दुसऱ्या मोटारीला धडकली. जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. चालकाला चोप देऊन नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले.

Web Title: motor accident