मकालू सर करण्यासाठी प्रियांकाकडून चढाई सुरू

Priyanka-Mohite
Priyanka-Mohite

जगातील उंच पाचवे (८४६३ मीटर) शिखर मोहीम
सातारा - माउंट एव्हरेस्ट, माउंट किलिमांजारो, एलब्रुस (रशिया), मेंटोसा, बंदरपूच आदी मोहिमांच्या यशस्वीतेनंतर शिवछत्रपती साहसी क्रीडा पुरस्कार विजेती गिर्यारोहक प्रियांका मंगेश मोहिते आता जगातील पाचवे (८४६३ मीटर ) उंच माउंट मकालू सर करण्यासाठी सज्ज झाली आहे. 

बुधवारी (ता. १७) सातारकरांच्या शुभेच्छा स्वीकारात प्रियांकाने आज लुकला येथून या मोहिमेस प्रारंभ केला. प्रियांकाने यापूर्वी माउंट एव्हरेस्ट, किलिमांजारो, ल्होत्से, एलब्रुस, मेंटोसा, बंदरपूच अशा वेगवेगळ्या मोहिमा मोठ्या जिद्दीने पूर्ण केलेल्या. तिने आठ हजार मीटर उंचीच्या १४ शिखरांवर झेंडा रोवण्याचा निर्धार केला आहे. त्यातीलच एक माउंट मकालू हे आहे. शारीरिक तंदुरुस्ती राखत तिने या मोहिमेची तयारी केली आहे. या मोहिमेत तिच्यासमवेत देशातील अन्य चार जण तसेच परदेशातील साधारणतः २२ ते २५ जण आहेत. या मोहिमेसाठी ती नुकतीच साताऱ्याहून रवाना झाली. पाच टप्प्यांत होणारी ही मोहीम ती १५ ते २० मे या कालावधीत पूर्ण करेल. ही मोहीम पूर्ण करणारी देशातील ती पहिली महिला ठरेल, असे अभिमानाने तिच्या पालकांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com